18 November 2024 11:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Sika Interplant Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सिका इंटरप्लांट सिस्टम्स शेअरने 3 दिवसात 40 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदी करावा का?

Sika Interplant Share Price

Sika Interplant Share Price | सिका इंटरप्लांट सिस्टम्स या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह 1161.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र सिका इंटरप्लांट सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. मागील 3 दिवसात सिका इंटरप्लांट सिस्टम्स कंपनीच्या शेअरमध्ये 40 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. (Sika Share Price)

या कंपनीच्या शेअरमध्ये इतकी वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, सिका इंटरप्लांट सिस्टम्स कंपनीला नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 520 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी सिका इंटरप्लांट सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 1,103.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

स्टॉक वाढीचे कारण :

सिका इंटरप्लांट सिस्टम्स कंपनीचे शेअर्स मागील 3 दिवसांत 44 टक्के मजबूत झाले आहेत. 11 ऑगस्ट 2023 या कंपनीचे शेअर्स या कंपनीचे शेअर्स 811.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 17 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 1161.80 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 3 ट्रेडिंग सेशनमध्ये सिका इंटरप्लांट सिस्टम्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 350.75 रुपये वाढली आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये एवढी वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे.

सिका इंटरप्लांट सिस्टम्स कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीला प्रगत अभियांत्रिकी उत्पादने आणि सेवा प्रदान करण्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या सुरुवातीपासून कंपनीला 117 कोटी रुपये मूल्याचे विविध ऑर्डर मिळाल्या आहेत. सिका इंटरप्लांट सिस्टम्स ही कंपनी मुख्यतः एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रांसाठी प्रगत उत्पादने आणि उपाय प्रदान करण्याचे काम करते.

गुंतवणुकीवर 4900 टक्के परतावा :

मागील एक वर्षात सिका इंटरप्लांट सिस्टम्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. 19 ऑगस्ट 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स 23.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 17 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1161.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कालावधीत कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 4929 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 19 ऑगस्ट 2013 रोजी सिका इंटरप्लांट सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 50.29 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sika Interplant Share Price today on 18 August 2023.

हॅशटॅग्स

Sika Interplant Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x