19 November 2024 12:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

आगामी लोकसभा निवडणुकीत झारखंडमध्ये भाजपला मोठा फटका बसण्याचे संकेत, ईडी'ने ऍक्शन मोडमध्ये, मुख्यमंत्र्यांना धाडली चौकशी नोटीस

CM Hemant Soren

ED Sent notice to CM Hemant Soren | लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये भाजपसाठी धोक्याची घंटा अनेक सर्व्हेत समोर आली आहे. आदिवासी मतदारांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या झारखंडमध्ये देखील भाजपसाठी धोक्याची घंटा सर्व्हेत स्पष्ट झाली आहे.

दुसरीकडे, ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही केवळ त्याच राज्यात ED धडाडीने कामं करत असल्याचा आरोप यापूर्वी देखील अनेक राज्यातील विविध पक्षांनी केला आहे. तोच प्रकार आता झारखंड मध्ये आक्रमकपणे सुरु झाला आहे अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण थेट झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना रडारवर ठेवण्यात आलं आहे. असं असलं तरी हे भाजपसाठी सोपं नाही, कारण या कारवाईने आदिवासी नेते असलेले आणि तरुणांमध्ये क्रेझ असलेले हेमंत सोरेन यांना पक्ष करून भाजप स्वतःचे अजून मोठे नुकसान करून घेईल असं देखील स्थानिक राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना दुसरे समन्स बजावले आहे. ईडीने सोरेन यांना २४ ऑगस्ट रोजी रांची विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. शनिवारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी मुख्यमंत्री सोरेन यांची त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेबाबत ही चौकशी करणार आहेत.

यापूर्वी ८ ऑगस्ट रोजी ईडीने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना समन्स बजावून १४ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण ते ईडीसमोर हजर झाले नाहीत. समन्स मागे घ्या, मी कायदेशीर सल्ला घेत आहे, असे पत्र त्यांनी ईडीला लिहिले आहे. या प्रकरणी तुमचे समन्स बेकायदेशीर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी लिहिले आहे. कायदेशीर सल्ल्यानेच ते पुढे जातील.

यापूर्वी दोनवेळा समन्स पाठवले

यापूर्वी ईडीने सोरेन यांना 14 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले होते. बेकायदा खाण प्रकरणी गेल्या वर्षी ३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना केंद्रीय एजन्सीने समन्स बजावले होते. त्यानंतर बेकायदा खाणकामाबाबत त्यांची चौकशी करण्यात आली. मुख्यमंत्री दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ईडीच्या चौकशीच्या कक्षेत आहेत.

News Title :  ED again sent notice to CM Hemant Soren call him Ranchi on 24th August details 19 August 2023.

हॅशटॅग्स

#CM Hemant Soren(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x