13 December 2024 2:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Vikas Ecotech Share Price | वेगात विकास! सरकारचा नव्हे, विकास इकोटेक शेअर्सचा, 3 रुपयाचा शेअर या बातमीने सुसाट तेजीत येणार

Vikas Ecotech Share Price

Vikas Ecotech Share Price | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना काही दिवसात मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या विकास इकोटेक लिमिटेडने यंदा आपले कर्ज कमी करण्याची योजना आखली होती. कंपनीने आतापर्यंत अनेक टप्प्यांत बँकेचे कर्ज हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न केला असून, त्याचा सकारात्मक परिणाम नफ्यावर होत आहे. बँकांचे कर्ज कमी झाल्याने विकास इकोटेकच्या नफ्यात चांगली वाढ नोंदवता येईल, असे शेअर बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.

कर्ज वेगाने कमी होतंय

अलीकडेच विकास इकोटेक लिमिटेडने बँकांना पाच कोटी रुपयांची रक्कम परत केल्याची माहिती शेअर बाजाराला दिली आहे. त्यानंतर विकास इकोटेकवरील बँकांचे एकूण कर्ज 60 कोटी रुपयांवर आले आहे. विकास इकोटेकवर बँकांचे 101.2 कोटी रुपयांचे कर्ज होते, ते आता 60 कोटीरुपयांवर आले आहे.

शून्य कर्ज कंपनी बनविण्याचे उद्दिष्ट

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत विकास इकोटेकने आणखी 10 कोटी रुपयांचे कर्ज फेडण्याची योजना आखली आहे, अशी माहिती विकास इकोटेकने शेअर बाजाराला दिली आहे. त्यानंतर विकास इकोटेकवर बँकांचे 50 कोटी रुपयांचे कर्ज असणार आहे. चालू आर्थिक वर्षात विकास इकोटेक आपल्या कंपनीला शून्य कर्ज कंपनी बनविण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षातच विकास इकोटेकला कर्जमुक्त कंपनी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

500 टक्के मल्टिबॅगर परतावा

3 एप्रिल 2020 पासून गुंतवणूकदारांना 500 टक्के बंपर परतावा देणाऱ्या विकास इकोटेक के लिमिटेडने एक मोठी घोषणा केली आहे. विकास इकोटेक लिमिटेड ने म्हटले आहे की ते एक संशोधन प्रयोगशाळा उभारणार आहेत ज्याच्या मदतीने त्याचे काम चांगल्या गतीने रेकॉर्ड केले जाऊ शकते. विकास इकोटेक लिमिटेड आंतरराष्ट्रीय मानके आणि एनएबीएल मान्यतेनुसार जागतिक दर्जाची संशोधन प्रयोगशाळा उभारणार असल्याची माहिती शेअर बाजाराला दिली आहे.

शेअरमध्ये पुन्हा तेजी येणार

स्पेशालिटी केमिकल्स आणि स्पेशल एडिटिव्ह्सची निर्मिती करणाऱ्या विकास इकोटेक लिमिटेडने काही दिवसांपूर्वी 50 कोटी रुपयांच्या स्पेशालिटी पॉलिमर कंपाऊंड आणि पॉलिमर एडिटिव्ह्सची ऑर्डर मिळाल्याची घोषणा केली होती. या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्येच या उत्पादनाचा पुरवठा होणार आहे. त्यानंतर विकास इकोटेकच्या शेअरमध्ये पुन्हा तेजी दिसू शकते, असे शेअर बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. विकास इकोटेक लिमिटेड ही स्पेशालिटी पॉलिमर संयुगे आणि स्पेशालिटी केमिकल्सच्या सुरुवातीच्या कंपन्यांपैकी एक आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Vikas Ecotech Share Price on 20 August 2023.

हॅशटॅग्स

#Vikas Ecotech Share Price(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x