25 November 2024 7:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN Mutual Fund SIP | SIP चा पैसा वसूल फॉर्म्युला, 7-5-3-1 रुलने होईल 10 कोटींची कमाई, सोपी ट्रिक समजून घ्या - Marathi News
x

हम तो फकीर आदमी है म्हणणाऱ्या मोदींच्या मंत्रिमंडळात ९१ टक्के मंत्री करोडपती

Narendra Modi, Amit Shah

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. गुरुवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर काल लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खात्यांचे वाटप केले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांचं रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच कायम ठेवण्यात आले आहे. मोदींच्या कॅबिनेटमधील एकूण ५६ मंत्र्यांपैकी ५१ मंत्री हे करोडपती आहे. त्यापैकी एकूण २२ जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती आता समोर आली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

एडीआर या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा आणि राज्यसभा यातील सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक मंत्र्यांकडे जवळपास १४.७२ कोटींची संपत्ती आहे. तर गृहमंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि अकाली दलाच्या हरसिमरत कौरबादल यांच्यासह ४ मंत्र्याकडे ४० कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांची सून आणि अकाली दल प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल या सर्वात श्रीमंत मंत्री आहेत.

हरसिमरत कौर बादल यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची एकूण संपत्ती २१७ कोटी रुपये आहे. ५६ मंत्र्यापैकी २२ मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यातील एकूण १६ जणांविरुद्ध अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने दिली आहे. तर ८ मंत्र्यांनी १०वी ते १२वीपर्यंतचे शिक्षण घेतलं असून ४७ मंत्री हे पदवीधर आहेत. शपथविधी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत २४ कॅबिनेट, नऊ राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) आणि २४ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x