12 December 2024 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

Multibagger Stock | मालामाल मल्टिबॅगर शेअर! या शेअरने 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर 1.14 कोटी रुपये परतावा दिला, खरेदी करणार?

Multibagger Stock

Multibagger Stock | इंडस्ट्रियल अँड प्रुडेंशियल इन्व्हेस्टमेंट या मुबई स्थित 90 वर्षे जुन्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना किंमत वाढीचा फायदा तर मिळाला आहे, यासह त्यांनी भरघोस लाभांश देखील कमावला आहे. मागील आर्थिक वर्ष 2023-24 साठी कंपनी प्रति शेअर 60 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती.

त्याप्रमाणे कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 17 ऑगस्ट 2023 हा दिवस निश्चित केला होता. आज सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी इंडस्ट्रियल अँड प्रुडेन्शियल इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के घसरणीसह 2,825.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इंडस्ट्रियल अँड प्रुडेंशियल इन्व्हेस्टमेंट ही एक कर्जंमुक्त कंपनी आहे. 24 सप्टेंबर 2002 रोजी इंडस्ट्रियल अँड प्रुडेंशियल इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 2800 रुपयेच्या पार गेला आहे. म्हणजेच मागील 21 वर्षापूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी इंडस्ट्रियल अँड प्रुडेंशियल इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.14 कोटी रुपये झाले आहे.

या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना केवळ चांगला नफा नाही तर मोठ्या प्रमाणात लाभांश देखील वाटप केले आहे. 21 मार्च 2023 रोजी इंडस्ट्रियल अँड प्रुडेंशियल इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 1505.80 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्यांनतर अवघ्या पाच महिन्यांत 14 ऑगस्ट 2023 रोजी पर्यंत या कंपनीचे शेअर्स 96 टक्के वाढीसह 2,947.95 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर पोहचले होते.

इंडस्ट्रियल अँड प्रुडेन्शियल इन्व्हेस्टमेंट कंपनीने आपल्या डिव्हिडंड वाटप करून देखील मोठा फायदा पोहोचवला आहे. 2003 पासून ही कंपनी दरवर्षी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करत आहे. 2019, 2020 आणि 2021 मध्ये कंपनीने 25-25 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप केला होता. त्यानंतर 2022 मध्ये या कंपनीने शेअर धारकांना प्रति शेअर 50 रुपये लाभांश वाटप केला होता. आणि 2023 मध्ये तर कंपनीने तब्बल 60 रुपये लाभांश वाटप केला होता.

2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत एप्रिल-जून 2023 मध्ये कंपनीच्या निव्वळ नफ्यात 7 टक्के वाढ झाली आहे. तर तिमाही आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 740 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

जून तिमाहीत कंपनीने 12.14 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. जून 2022 तिमाहीत कंपनीने 11.62 कोटी रुपये ऑपरेशनल रेव्हेन्यू कमावला आहे. तर जून 2023 तिमाहीत कंपनीने 13.48 कोटी रुपये ऑपरेशनल रेव्हेन्यू कमावला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock of Industrial & Prudential Investment Share Price on 21 August 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x