23 November 2024 5:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

DB Realty Share Price | बापरे! डीबी रियल्टी शेअरने एका महिन्यात 40 टक्के परतावा दिला, तुम्ही कसली वाट बघताय? खरेदी करणार?

DB Realty Share Price

DB Realty Share Price | डीबी रियल्टी या रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनीचे शेअर्स धमाकेदार कामगिरी करत आहेत. अवघ्या एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 40 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. नुकताच Authm Investment and Infrastructure कंपनीने DB Realty कंपनीमध्‍ये 1.9 टक्के भाग भांडवल खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली होती.

डीबी रियल्टी कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शेवटच्या दिवशी 137 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 107 टक्के नफा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी डीबी रियल्टी कंपनीचे शेअर्स 1.56 टक्के घसरणीसह 138.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

डीबी रियल्टी ही कंपनी रिअल सेक्टरमध्ये व्यवसाय करते. ही कंपनी विशेषतः व्यावसायिक आणि गृहनिर्माण विभागांशी संबंधित प्रकल्प बनवण्याचे काम करते. कंपनीची रिअल इस्टेट विकास आणि भाडेपट्टीतून मोठ्या प्रमाणात कमाई करते. या कंपनीचे शेअर्स 2007 पासून शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. डीबी रियल्टी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5617 कोटी रुपये आहे.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी देखील डीबी रियल्टी कंपनीचे 1.21 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 35.98 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत, तर प्रवर्तकांनी एकूण 64 टक्के भाग भांडवल आपल्या ताब्यात ठेवले आहे.

डीबी रियल्टी कंपनीने नुकताच आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करून कामगिरीची माहिती दिली होती. जून 2023 तिमाहीत या कंपनीला 22.54 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. मागील वर्षीच्या जून तिमाहीत या कंपनीला 12 कोटी रुपये निव्वळ नफा मिळाला होता. डीबी रियल्टी कंपनीचे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम मानले जातात. सध्या जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला स्टॉक स्वस्त होण्याची वाट पाहावी लागेल.

शेअर बाजारातील तज्ञांनी डीबी रियल्टी कंपनीच्या स्टॉकवर 140 रुपये लक्ष किंमत आणि 93 रुपये स्टॉप लॉस निश्चित करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. व्हेंचुरा सिक्युरिटीजच्या तज्ञांनी या कंपनीच्या स्टॉक मध्ये किमान 3 ते 4 वर्षांचा दृष्टीकोन ठेवून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. डीबी रियल्टी या कंपनीचे शेअर्स उच्च जोखीम असलेले मात्र उच्च परतावा देणाऱ्या गटातील शेअर्स मानले जातात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| DB Realty Share Price today on 22 August 2023.

हॅशटॅग्स

DB Realty Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x