22 November 2024 2:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Sahaj Fashions IPO | आला रे आला IPO आला! शेअरची किंमत फक्त 30 रुपये, कमाई करणार का? वाचा IPO तपशील

Sahaj Fashions IPO

Sahaj Fashions IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच सहज फॅशन ही कंपनी आपला IPO बाजारात लाँच करणार आहे. या कंपनीचा IPO शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 ते मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. सहज फॅशन कंपनीने आपल्या IPO ची इश्यू किंमत 30 रुपये जाहीर केली आहे. सहज फॅशन कंपनीच्या IPO चा आकार 13.96 कोटी रुपये असेल.

सहज फॅशन्स कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले 4,476,000 शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. याचे एकूण मूल्य 13.43 कोटी रुपये असेल. सहज फॅशन कंपनी शुक्रवार 1 सप्टेंबर 2023 रोजी IPO शेअर्स गुंतवणुकदारांना वाटप करेल. आणि ज्या लोकांना शेअर्स मिळाले नाही, त्यांना सोमवार दिनांक 4 सप्टेंबर पासून रिफंड मिळाल्याला सुरुवात होईल. मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी IPO शेअर्स गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा होतील.

सहज फॅशन्स कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील. आपल्या IPO च्या माध्यमातून जमा होणारी रक्कम कंपनी मार्जिन मनी राखण्यासाठी, कर्जांची परतफेड करण्यासाठी तसेच कॉर्पोरेट हेतूंची पूर्तता करण्यासाठी काहीच करणार आहे. कंपनी काही रक्कम आपल्या कार्यरत भांडवलाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी देखील खर्च करणार आहे.

कंपनीच्या प्रवर्तकांमध्ये रोहित तोष्णीवाल, साधना तोष्णीवाल, नोरत मल चौधरी, प्रभा लखोटिया, राकेश चौधरी, मुकुल लखोटिया, नितीन तोष्णीवाल हे आहेत. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सहज फॅशन कंपनीच्या IPO साठी रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आणि खंबाट्टा सिक्युरिटीज लिमिटेड कंपनीला IPO चे लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sahaj Fashions IPO for investment on 23 August 2023.

हॅशटॅग्स

Sahaj Fashions IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x