25 November 2024 8:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Paramount Cables Share Price | 55 रुपयाचा शेअर! 5 दिवसात 15 टक्के आणि 1 महिन्यात 33 टक्के परतावा दिला, संयम आयुष्य बदलेल

Paramount Cables Share Price

Paramount Cables Share Price | पॅरामाउंट केबल्स या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.5 टक्क्यांच्या वाढीसह 55.85 रुपये किमीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 33 टक्के नफा कमावून दिला आहे.

22 फेब्रुवारी 2023 रोजी पॅरामाउंट केबल्स कंपनीचे शेअर्स 34.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून शेअरची किंमत आता 62 टक्के वाढली आहे. आज बुधवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी पॅरामाउंट केबल्स कंपनीचे शेअर्स 1.30 टक्के वाढीसह 54.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी पॅरामाउंट केबल्स कंपनीचे शेअर्स 28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता ऑगस्ट महिन्यात हा स्टॉक 55 रुपयेवर पोहचला आहे. या काळात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. पॅरामाउंट केबल्स कंपनीचे शेअर्स 29 जुलै 2022 रोजी 11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 5 पट अधिक किमतीवर ट्रेड करत आहे. पॅरामाउंट केबल्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1031 कोटी रुपये आहे. पॅरामाउंट केबल्स कंपनीने नुकताच एक कंपनी विकत घेतली असल्याची बातमी आली होती.

आज बुधवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी पॅरामाउंट केबल्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. यात व्हॅलेन्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विद्यमान शेअर धारकांकडून 100 टक्के इक्विटी शेअर्स खरेदी करून कंपनीची मालकी ताब्यात घेण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.

पॅरामाउंट केबल्स कंपनीने सेबी दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, 25 ऑगस्ट 2023 पर्यंत व्हॅलेन्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग केली जाणार नाही. पॅरामाउंट केबल्स या कंपनीला व्यवसाय क्षेत्रातील 60 वर्षाचा अनुभव आहे. ही कंपनी मुख्यतः पॉवर केबल, टेलिकॉम केबल, कंट्रोल केबल, डोमेस्टिक वायर, स्पेशल केबल बनवण्याचे काम करते. पॅरामाउंट केबल्स कंपनी रेल्वे आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांमध्ये वापरले जाणारे मजबूत केबल्स बनवण्याचे काम देखील करते.

पॅरामाउंट केबल्स कंपनी विविध प्रकल्पांसाठी लागणाऱ्या एकात्मिक श्रेणी संबंधित सेवा देखील प्रदान पुरवण्याचे काम करते. 23 ऑगस्ट 2013 रोजी पॅरामाउंट केबल्स कंपनीचे शेअर्स 1.25 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. आता या कंपनीची किंमत 40 पट अधिक वाढली आहे. मागील 5 वर्षांत पॅरामाउंट केबल्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्के नफा कमावून दिला आहे. 24 ऑगस्ट 2018 रोजी या कंपनीचे शेअर्स 14 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paramount Cables Share Price today on 23 August 2023.

हॅशटॅग्स

Paramount Cables Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x