Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरचा सुवर्ण काळ सुरु झाला? आजही तेजीत, शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती?
Suzlon Share Price | नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. आज या कंपनीच्या शेअरमध्ये बंपर खरेदी पाहायला मिळत आहे. 17 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर बुधवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर्स 21.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.
मंगळवारी देखील सुझलॉन स्टॉक 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 21.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 3.43 टक्के वाढीसह 22.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सध्या सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स आपल्या मे 2017 नंतरच्या सर्वोच्च किंमत पातळीवर पोहचले आहेत. मागील चार व्यापार दिवसांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 29,651.04 कोटी रुपये आहे. अवघ्या तीन महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने मागील तीन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 130 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. 11 ऑगस्ट 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 21.25 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 13 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
तांत्रिकदृष्ट्या पाहिले तर तुम्हाला समजेल की, सुझलॉन एनर्जी स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 60.7 वर आहे. यावरून कळते की, हा स्टॉक जास्त ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झालेला नाही. सुझलॉन एनर्जी शेअर्सचा बीटा 1.6 आहे, यावरून स्टॉक खूप उच्च अस्थिरता दर्शवतो असे समजते. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीवर ट्रेड करत आहेत.
प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञानुसार सुझलॉन एनर्जी कंपनीच्या स्टॉकमध्ये 18-21 रुपये किमतीवर सकारात्मक सपोर्ट पाहायला मिळत आहे. स्टॉकमध्ये 21 रुपये किमतीवर प्रतिरोधक पाहायला मिळत आहे. तर तज्ञांनी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरवर पाहिली लक्ष किंमत 25 रुपये दुसरी लक्ष किंमत 29 रुपये निश्चित केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Suzlon Share price today on 24 August 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार