23 November 2024 12:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT
x

Crane Infra Share Price | होय! अल्पावधीत 3 अंकी परतावा देणाऱ्या शेअरची किंमत फक्त 29 रुपये, क्रेन कंपनीचा शेअर खोऱ्याने पैसा देतोय

Crane Infra Share Price

Crane Infra Share Price | क्रेन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे 200 टक्के वाढवले आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये क्रेन इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 26.58 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

आज गुरूवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी क्रेन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 29.29 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये क्रेन इन्फ्रा स्टॉक 2.6 टक्के वाढीसह ओपन झाला होता. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 120 टक्के वाढवले आहे.

क्रेन इन्फ्रा लिमिटेड ही कंपनी मुख्यतः रिअल इस्टेट व्यवसाय आणि प्रॉपर्टी विकास कामात गुंतलेली आहे. या कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. आणि त्यानंतर कंपनीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहोचले.

16 ऑगस्ट 2023 रोजी क्रेन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. त्यावेळी शेअरची किंमत 16.6 रुपयेवर पोहचली होती. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये क्रेन इन्फ्रा स्टॉक पुन्हा एकदा 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. आणि शेअरची किंमत 20 रुपयेवर पोहचली होती.

2023-24 आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत क्रेन इन्फ्रा कंपनीची निव्वळ विक्री मागील वर्षाच्या जून 2022 तिमाहीच्या तुलनेत 865 टक्के वाढीसह 2.51 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. रिअल इस्टेट आणि प्रॉपर्टी डेव्हलपमेंट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या क्रेन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या उत्कृष्ट तिमाही कामगिरीमुळे कंपनीचे शेअर्स अप्रतिम तेजीत वाढत आहेत. क्रेन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल फक्त 15 कोटी रुपये आहे.

मागील 3 वर्षांत कंपनीच्या बाजार भांडवलात देखील 80 टक्के वार्षिक वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या डोक्यावर किरकोळ कर्ज आहे, मात्र कंपनीच्या कामकाजात देखील मजबूत वाढ पाहायला मिळत आहे. क्रेन इन्फ्रा कंपनी अवघ्या 1 वर्षात गुंतवणुकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. आणि मागील 3 वर्षांत या कंपनीच्या स्टॉकने लोकांना 500 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Crane Infra Share Price today on 24 August 2023.

हॅशटॅग्स

Crane Infra Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x