23 November 2024 9:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुपवर सेबीने उगारला कारवाईचा बडगा, शेअरमध्ये लोअर सर्किटची मालिका, शेअरचं काय होणार?

Brightcom Share Price

Brightcom Share Price | सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने मागील काही वर्षात आपल्या कठोर कारवाईने बरेच गैरप्रकार हाणून पाडले आहेत. आता सेबीने ब्राइटकॉम ग्रुप कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 21.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Brightcom Group Share Price)

मागील काही महिन्यांपासून या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत होती. तेव्हा शेअरची किंमत आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 145 टक्क्यांनी वाढली होती. आता मात्र या स्टॉकमध्ये रोज लोअर सर्किट लागत आहे. आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 5.01 टक्के घसरणीसह 20.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

28 एप्रिल 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप शेअर 9.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर 23 ऑगस्ट 2022 रोजी हा स्टॉक 49.05 रुपये किमतीवर पोहचला होता. आता मात्र हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 53.15 टक्क्यांनी कमजोर झाला आहे.

मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1,066.50 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीमध्ये दिग्गज गुंतवणुकदार शंकर शर्मा यांनी देखील पैसे लावले आहेत. त्यांनी जून 2023 पर्यंत कंपनीचे एकूण 1.14 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. मागील तिमाहीच्या तुलनेत हे प्रमाण 1.24 होते, जे आता कमी झाले आहे.

शेअर बाजार नियामक SEBI ने ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या विरोधात जाहीर केलेल्या एका अंतरिम आदेशात कंपनीचे उच्च अधिकारी सुरेश कुमार रेड्डी आणि नारायण राजू यांना कोणतेही संचालकपद धारण करण्यास बंदी घातली आहे. सुरेश कुमार रेड्डी हे ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे प्रवर्तक/सहअध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत होते. आता त्यांना आपल्या पदापासून दूर राहण्याचा आदेश सेबीने दिला आहे. सेबीने कंपनीचे गुंतवणूकदार शंकर शर्मा यांना देखील आपले शेअर्स विकण्यास बंदी घातली आहे. सेबीच्या या कठोर आदेशामुळे कंपनीशी संबंधित 25 संस्था आणि व्यक्ती नकारात्मकरित्या प्रभावित होण्याची शक्यता आहे.

सेबीच्या या कारवाईवर ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने म्हंटले आहे की, “या निर्णयाचे पूर्ण पुनरावलोकन करण्यासाठी आम्ही एक अंतर्गत टीमची स्थापना केली आहे. आणि कंपनी कायदेशीर आवश्यक सल्ला देखील घेत आहे. कंपनीचे सर्व निर्णय हे कंपनी आणि शेअर धारकांच्या हितासाठी आहेत”.

ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी ट्विटरवर लिहिले आहे, आम्ही सेबीकडे सर्व डेटा सबमिट केला आहे. सेबी लवकरच या प्रकरणाचे निराकरण करेल अशी अपेक्षा आहे. ब्राइटकॉम ग्रुप ही कंपनी सेबीच्या नजरेत पडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील सेबीने ब्राइटकॉम ग्रुप कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. कंपनीच्या शेअरहोल्डिंग मधील अनियमित आणि चुकीच्या फाइलिंगबद्दल सेबीने कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Brightcom Share Price today on 25 August 2023

हॅशटॅग्स

Brightcom Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x