19 April 2025 3:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
x

Taal Enterprises Share Price | चमत्कारी शेअर! फक्त 3 वर्षात गुंतवणुकदारांचा पैसा 20 पटीने वाढवला ताल एंटरप्रायझेस शेअरने, डिटेल्स पहा

Taal Enterprises Share Price

Taal Enterprises Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल यांनी ताल एंटरप्रायझेस कंपनीचे 8.9 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. ताल एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे 2.78 लाख शेअर्स मुकेश अग्रवाल यांनी होल्ड केले आहेत. या शेअरचे एकूण बाजार मूल्य सध्या 56.4 कोटी रुपये आहे.

ताल एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे 20 पट अधिक वाढवले आहेत. मुकुल अग्रवाल यांनी शेअर बाजारातील विविध 57 कंपनीचे 1 टक्के पेक्षा जास्त शेअर्स होल्ड केले आहेत. त्यांच्या एकूण पोर्टफोलिओचे मूल्य 4109 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी ताल एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 1.29 टक्के घसरणीसह 1,961.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ताल एंटरप्रायझेस ही कंपनी तंत्रज्ञान क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. ही कंपनी अभियांत्रिकी आणि डिजिटलायझेशन सेवांमध्ये तज्ञ मानली जाते. ताल एंटरप्रायझेस कंपनीचे ग्राहक अमेरिका, कॅनडा, युरोप, मध्य पूर्व आणि APAC देशांमध्ये पसरले आहेत.

ताल एंटरप्रायझेस कंपनी तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या ग्राहकांच्या कामाला गती देण्याचे काम करते. ताल एंटरप्रायझेस कंपनीचा ग्राहक रिपीटेशन दर 90 टक्के आहे. ताल एंटरप्रायझेस कंपनी डिझाईन लेड इंजिनीअरिंग अँड ट्रान्सफॉर्मेशन ऍक्ट इनिशिएटिव्हजचा वापर करून आपल्या ग्राहकांना सुरळीत काम पूर्ण करण्यास मदत करते.

ताल एंटरप्रायझेस कंपनीचे प्रतिबद्धता मॉडेल तीन भागात म्हणजेच लार्ज ऑफशोर इंडिया डिझाईन सेंटर, उच्च मूल्य अभियांत्रिकी केंद्र आणि फॉर्म ऑफ सेंटर ऑफ एक्सपर्टाइज मध्ये विभागण्यात आले आहेत. ताल एंटरप्रायझेस कंपनीच्या समभागांनी मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहे.

9 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 114 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर शेअरची किंमत तब्बल 20 पट अधिक वाढली आहे. 18 नोव्हेंबर 2021 रोजी ताल एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 1063 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 625 कोटी रुपये आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी हा स्टॉक 1468 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या किमतीच्या तुलनेत शेअरची किंमत आता 50 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Taal Enterprises Share Price today on 25 August 2023

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Taal Enterprises Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या