18 November 2024 7:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये
x

Patel Engineering Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 59 रुपयाचा शेअर रोज अप्पर सर्किटवर धडकून पैसा देतोय, भरघोस ऑर्डर्स मिळत आहेत

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | मागील काही महिन्यांपासून पटेल इंजिनीअरिंग या सिव्हिल कन्स्ट्रक्शन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीला एका पाठोपाठ एक अशा मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळत आहेत. आता या कंपनीने पुन्हा एकदा 1,818 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली असल्याची माहिती दिली आहे. ही बातमी प्रसिद्ध होताच पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किट तोडत आहेत.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये 57.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 58.54 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 59.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑर्डरचे तपशील

पटेल इंजिनीअरिंग कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीला संयुक्त भागीदारीसह दिबांग बहुउद्देशीय प्रकल्पामध्ये काम सुरू करण्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत हेड रेस बोगदा, इनटेक, प्रेशर शाफ्ट, पेनस्टॉक्स, पॉवर हाऊस, ट्रान्सफॉर्मर केव्हर्न, टेल रेस बोगदा, पॉटहेड यार्ड, एडिट्स इत्यादी बांधकाम करण्यात येणार आहे. हा प्रकल्प अरुणाचल प्रदेश राज्यात उभारण्यात येणार असून, त्याचे काम 86 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्याच वेळी या प्रकल्पाचे एकूण मूल्य 3,637.12 कोटी रुपये आहे. या संयुक्त उपक्रमात पटेल इंजिनिअरिंग कंपनीने 50 टक्के गुंतवणूक करून भागीदारी केली आहे.

भरघोस ऑर्डर्स मिळत आहेत

नुकताच काही महिन्यांपूर्वी पटेल इंजिनीअरिंग कंपनीला मध्य प्रदेश राज्य सरकारकडून काही मोठ्या ऑर्डर प्राप्त झाल्या होत्या. मध्य प्रदेश जल निगमने पटेल इंजिनीअरिंग कंपनीला 1,275.30 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर दिली होती. या करारात कंपनीचा हिस्सा 446.36 कोटी रुपये आहे. पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 20,000 कोटी रुपये आहे. पटेल इंजिनीअरिंग कंपनीला या व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा 74 वर्षाचा अनुभव आहे.

पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीची स्थापना 74 वर्षापुर्वी झाली होती. या कंपनीची स्थापना 1949 साली करण्यात आली होती. ही कंपनी जलविद्युत आणि धरण प्रकल्पांसाठी बोगदा तसेच भूमिगत कामांसंबंधित कार्यात तज्ञ मानली जाते. या कंपनीने भारतात 85 पेक्षा जास्त धरणे, 40 जलविद्युत प्रकल्प, आणि 300 किमी पेक्षा जास्त लांबीचे बोगदे बनवण्याचे काम केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Patel Engineering Share Price today on 29 August 2023

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x