Tejas Networks Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा समूहाशी संबंधित तेजस नेटवर्क्स शेअर्सनी 3 वर्षात 1200% परतावा दिला, खरेदी करणार?
Tejas Networks Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या तेजस नेटवर्क्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3 वर्षांत मजबूत नफा कमावून दिला आहे. तेजस नेटवर्क्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः ऑप्टिकल आणि डेटा नेटवर्किंग संबंधित व्यवसायात तज्ञ मानली जाते. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत अफाट वाढली आहे. 25 ऑगस्ट 2020 रोजी तेजस नेटवर्क्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 64.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 25 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 847.20 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 1,204 टक्के नफा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी तेजस नेटवर्क्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के घसरणीसह 838.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअरची कामगिरी
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजस नेटवर्क्स स्टॉक 843.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 893 रुपये होती. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 0.73 टक्क्यांच्या वाढीसह 847.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टाटा समूहाचा भाग असलेल्या तेजस नेटवर्क्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 14,370 कोटी रुपये आहे. 1 जानेवारी 2023 रोजी टाटा या कंपनीचे शेअर्स 510.05 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 20 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 893 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.
जून तिमाही कामगिरी
तेजस नेटवर्क्स लिमिटेड कंपनीने जून तिमाहीत महसुलात एकूण 43.56 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मात्र जून 2023 च्या तिमाहीत कंपनीला मागील वर्षीच्या तुलनेत 296 टक्के वाढीसह 26.29 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. महिला वर्षी जून 2022 तिमाहीत तेजस नेटवर्क्स कंपनीला 6.64 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. तथापि चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीने 43.56 टक्के वाढीसह 207.37 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
मागील वर्षी या कंपनीने 144.45 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. निव्वळ नफ्याच्या बाबतीत कंपनीने डिसेंबर 2021 पासून काही खास कामगिरी केली नाहीये. मागील 7 पैकी 6 तिमाहीत तेजस नेटवर्क्स कंपनीला जबरदस्त तोटा सहन करावा लागला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Tejas Networks Share Price today on 29 August 2023
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News