27 April 2025 9:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
e Filing Income Tax | पगारदारांनो, नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 75000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन मिळणार नाही? मोठी अपडेट LIC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या सरकारी फंडात, अनेक पटीने पैसा परतावा मिळतोय, सेव्ह करून ठेवा EPFO Passbook | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPF प्रक्रियेत मोठे बदल, हक्काच्या पैशाबाबत अपडेट Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

हुशार मतदारांचे अभिनंदन! 2014 मध्ये तुम्हाला महाग वाटलेला 410 रुपयाचा गॅस सिलेंडर पीएम मोदी आता रु. 903 इतका स्वस्तात देणार

Election LPG Price

Election LPG Price | देशात पुढचे ६-७ महिने अनेक राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे आहेत. त्यामुळे देशातील प्रचंड वाढलेली महागाई आणि बेरोजगारी भोगण्याची शक्यता असल्याने मोदी सरकारला प्रचंड धास्ती होती. त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने मोदी सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती २०० रुपयांनी कमी केल्या आहेत.

महागाईवरून ९ वर्ष न आठवलेलं रक्षाबंधन मोदींना निवडणुकीपूर्वी आठवलं

मोदी सरकार सलग ९ वर्ष सत्तेत आहे, मात्र ९ वर्ष सत्तेत असूनही कधीच न आठवलेल्या महाग गॅस सिलेंडरच्या किंमती आता लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आठवल्या आहेत. विशेष म्हणजे महागाईमुळे ९ वर्ष होरपळणाऱ्या बहिणींची (गृहिणींना) पंतप्रधान मोदींना ९ वर्षानंतर आठवण आली आहे. विशेष म्हणजे रक्षाबंधन दर वर्षी येते, पण मोदींना जणू रक्षाबंधन ९ वर्षांनी येते असं वाटलं असावं म्हणून त्यांनी एक ट्विट करत देशातील बहिणींसाठी रक्षाबंधनाची भेट असल्याचं म्हटल्याने समाज माध्यमांवर प्रचंड टीका सुरु झाली आहे.

मोदींनी 2014 मध्ये 410 रुपयाच्या गॅस सिलेंडरला महाग म्हटलेलं

मुळात मोदी सत्तेत आले त्यावेळी त्यांनी महागाई आणि बेरोजगारी मुद्द्याचं कारण दिलं होतं. मात्र पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी याच मुद्यांकडे सलग ९ वर्ष दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे मोदींनी २०१४ मध्ये 410 रुपयाच्या गॅस सिलेंडरला महाग म्हटलेलं, त्याच गॅस सिलेंडरच्या सध्याच्या ९०० रुपयांच्या किंमतीला ते स्वस्त बोलत आहेत याचीच चर्चा रंगली आहे.

आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांना गॅस सिलिंडरवर २०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी ही माहिती दिली. सरकारच्या या निर्णयानंतर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 200 रुपये अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. अशा प्रकारे पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर एकूण 400 रुपये सबसिडी मिळणार आहे.

यापूर्वी मार्च 2023 मध्ये केंद्र सरकारने पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रत्येक एलपीजी सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी देण्याच्या योजनेला एक वर्षासाठी मुदतवाढ दिली होती.

पीएमयूवाय बद्दल जाणून घ्या

ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना एलपीजी सिलिंडर मिळावा यासाठी केंद्र सरकारने मे २०१६ मध्ये पीएम उज्ज्वला योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सरकार गरीब कुटुंबातील महिलांना कोणत्याही ठेवीशिवाय गॅस सिलिंडर पुरवते. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत देण्यात येणारे अनुदान थेट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.

सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षात पीएमयूवायवर 6,100 कोटी रुपये खर्च केले होते. तर 2022-23 या आर्थिक वर्षात सरकारने या योजनेवर 7,680 कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

अशी आहे एलपीजी सिलिंडरची किंमत

सध्या दिल्लीत 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 1053 रुपये आहे. तर कोलकात्यात 14.2 किलो च्या एलपीजी सिलिंडरची किंमत 1079 रुपये आहे. मुंबईत १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत १०५२.५० रुपये आहे. चेन्नईत या सिलिंडरची किंमत १०६८.५० रुपये आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Election LPG Price Cut by 200 rupees check details on 30 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Election LPG Price Cut(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या