22 November 2024 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

Aeroflex Industries IPO | IPO ठरत आहेत लॉटरी! एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज आयपीओ शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 83 टक्के परतावा दिला

Aeroflex Industries IPO

Aeroflex Industries IPO | शेअर बाजारात एकमागुन एक IPO लाँच होण्याचा धडाका सुरू आहे. आणि हे IPO आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून देत आहेत. नुकताच एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांची गुंतवणूक असलेल्या एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारी सूचीबद्ध करण्यात आले आहेत. (Aeroflex Share Price)

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 83 टक्के प्रीमियम वाढीसह 197.40 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. आज शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.83 टक्के घसरणीसह 161.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 108 रुपये प्रति शेअर जाहीर केली होती. एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 190.00 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. आणि त्याच दिवशी स्टॉकमध्ये अप्पर सर्किट देखील लागला होता.

शेअरची लिस्टिंग किंमत इश्यू किमतीपेक्षा 76 टक्के अधिक होती. एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीचा आयपीओ 22 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी लाँच करण्यात आला होता. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO ला अक्षरशः डोक्यावर घेतले होते.

एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीचा IPO एकूण 97.11 पट अधिक सबस्क्राइब करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO चा एकूण आकार 351 कोटी रुपये होता. एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO मध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 194.73 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 126.13 पट अधिक खरेदी केला गेला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 34.41 पट अधिक खरेदी सबस्क्राईब झाला होता.

एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 102 रुपये ते 108 रुपये निश्चित करण्यात आली होती. या कंपनीने IPO ओपनिंगच्या पूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून 103.68 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. या कंपनीच्या अँकर बुकमध्ये 10 अँकर गुंतवणुकदार सामील आहेत. ज्यात म्युच्युअल फंड, विमा आणि NBFC ट्रेझरी पर्यायी गुंतवणूक निधी, आणि परदेशी पोर्टफोलिओ संस्थांनी भाग घेतला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Aeroflex Industries IPO today on 01 September 2023.

हॅशटॅग्स

Aeroflex Industries IPO(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x