22 November 2024 7:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

Vikas Lifecare Share Price | पेनी स्टॉक 4 रुपये 30 पैशाचा! मागील 5 दिवसात 19% परतावा, तर मागील 1 महिन्यात 44% परतावा दिला

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. 31 ऑगस्ट 2023 रोजी विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध चर्चा करून निर्णय मंजुर करण्यात आले आहेत.

विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या प्रवर्तकाला 10 कोटी रुपये मूल्याचे प्रेफरंस शेअर्स जारी करण्याची घोषणा केली आहे. प्रेफरंस शेअर्स 4 रुपये प्रति शेअर या किमतीवर वाटप केले जाणार आहे. विकास लाइफकेअर कंपनी प्रेफरंस शेअर्स द्वारे 40 कोटी रुपये भांडवल जमा करेल. शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.27 टक्के घसरणीसह 4.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 31 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीच्या 28 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिवस 30 सप्टेंबर 2023 निश्चित करण्यात आला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात 4.35 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

मागील 5 दिवसात विकास लाइफ केअर कंपनीचे शेअर्स 3.70 रुपये वरून 19 टक्के वाढले होते. मागील 1 महिन्यात विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 3.05 रुपयेवरून वाढून 4.40 रुपये किमतीवर पोहचली होती. आणि गुंतवणूकदारांनी या तेजीतून 44.26 टक्के नफा कमावला आहे.

मागील 6 महिन्यांत विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 12 टक्के परतावा कमावून दिला आहे. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 632 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.40 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 2.70 रुपये होती. विकास लाइफ केअर लिमिटेड ही कंपनी मुख्यतः टॉक्सिन फ्री स्पेशालिटी केमिकल्स बनवण्याचे काम करते. विकास लाइफकेअर कंपनी जगभरात विशेष रासायनिक उपाय प्रदान करण्याचे काम करते. या कंपनीची विशेष रसायने अन्न आणि पिण्याचे पाणी वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price today on 02 September 2023.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x