22 November 2024 8:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

PPF Calculator | होय! तुमच्या मुलांसाठी देखील उघडू शकता PPF खाते, जाणून घ्या गुंतवणुकीचे फायदे

PPF Calculator

PPF Calculator | झपाट्याने वाढणाऱ्या महागाईच्या युगात जवळपास सर्वच पालकांना आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता (PPF Interest Rate) सतावत असते. अशा तऱ्हेने येणाऱ्या काळात सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर गुंतवणुकीला (PPF Calculator SBI) सुरुवात केली पाहिजे. मुलांच्या सुरक्षित भवितव्यासाठी (PPF Withdrawal Rules) हे चांगले ठरेल.

जर तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल आणि त्यासाठी चांगल्या योजनेच्या शोधात असाल तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) मध्ये खाते उघडू शकता. पीपीएफमध्ये तुम्ही मुलांच्या नावावर गुंतवणूक करून त्यांचे भविष्य सुरक्षित करू शकता. कोणतीही व्यक्ती पीपीएफमध्ये आपले खाते उघडू शकते, तर चला जाणून घेऊया पीपीएफमध्ये खाते उघडण्याची प्रक्रिया आणि त्याचे फायदे.

खाते उघडण्याचे नियम काय आहेत?

यामध्ये एक व्यक्ती एकच खाते उघडू शकते. त्याचबरोबर आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने पीएफ खाते उघडण्याचा ही पर्याय आहे. मुलाचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंतच त्याचे खाते पालकच चालवू शकतात. मूल १८ वर्षांचे झाल्यावर पीएफ खाते त्याच्या नावावर ट्रान्सफर केले जाते.

हे खाते १५ वर्षांसाठी आहे. यामध्ये तुम्ही मुलांसाठी कमीत कमी 500 रुपये जमा करून पीपीएफ खाते उघडू शकता. यामध्ये तुम्ही वार्षिक जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता.

पीपीएफ खात्याचे फायदे काय आहेत?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीपीएफ खात्यातील ठेवींवर सध्या 7.1 टक्के व्याज दर आहे. हा व्याजदर मुलांच्या खात्यालाही लागू होतो. यामध्ये तुम्हाला इन्कम टॅक्सच्या सेक्शन 80 सी अंतर्गत टॅक्समध्ये सूट मिळते.

इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार मुलाच्या खात्यात जमा झालेली रक्कम जर त्याच्या आई-वडिलांनी किंवा पालकांनी कमावली असेल तर ते त्यावर करसवलतही घेऊ शकतात. याशिवाय खात्यातून पैसे काढल्यास कोणताही कर कापला जात नाही. खाते उघडल्यानंतर 7 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनामत रकमेतून काही रक्कम काढता येते.

मुलांसाठी पीपीएफ खाते कसे उघडावे

मुलांसाठी पीपीएफ खाते उघडण्यासाठी जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. येथे जाऊन पीपीएफ खाते उघडण्यासाठी अर्ज घ्यावा लागेल. यानंतर त्यात मागितलेली सर्व माहिती नोंदवावी लागणार आहे. यानंतर अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल. अधिकारी फॉर्म चेक करेल त्यानंतर खाते उघडले जाईल.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : PPF Calculator PPF Interest Rate PPF Calculator SBI 03 September 2023.

हॅशटॅग्स

#PPF Calculator(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x