23 November 2024 1:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Vikas Lifecare Share Price | वडापाव पेक्षा स्वस्त मिळतोय विकास लाइफकेअर शेअर, 4.90 पैशाचा स्वस्त शेअर आज सुसाट अप्पर सर्किटकडे?

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | आजकाल महागाई एवढी वाढली आहे, की बाजाराला गेल्यावर लोकांचे खिसे रिकामे होऊन जातात. गुंतवणुक करणे आणि बचत करणे म्हणजे कुठे तरी तडजोड करून पैसे जमा करावे लागतात. आजकाल तर वडापाव सुद्धा 10 रुपयेमध्ये मिळत नाही. मात्र असे काही शेअर्स आहेत, जे 10 रुपये पेक्षा निम्म्या किमतीवर मिळत आहेत आणि गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून सुद्धा देतात.

आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक बद्दल जाणून घेणार आहोत. या कंपनीचे नाव आहे, विकास लाइफकेअर. या कंपनीचे शेअर्स सध्या 10 रुपये पेक्षा स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 3.49 टक्के वाढीसह 4.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी विकास लाइफकेअर शेअर्स 3.16 टक्के वाढीसह 4.90 रुपये (NSE सकाळी 10:00 वाजता) किमतीवर ट्रेड करत आहे.

पुढील काळात या स्मॉल-कॅप स्टॉक मजबूत तेजी पाहायला मिळू शकतो. या कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच 10 कोटी प्रेफरंस शेअर्स जारी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रेफरंस शेअर्सचे मूल्य 4 रुपये असेल. मागील आठडव्याच्या शुक्रवारी ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 4.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. कंपनीने प्रेफरंस शेअर्स जारी करून 40 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा निर्णय घेतला होता. विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE या दोन्ही इंडेक्सवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 617 कोटी रुपये आहे.

विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.70 रुपये होती. या स्मॉल-कॅप कंपनीने सेबीला प्रेफरंस शेअर्स जारी करून भांडवल उभारण्याची योजना कळवली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार “सेबी लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन ॲक्ट 2015 च्या रेग्युलेशन 30 नुसार कंपनी नियामकला कळवू इच्छितो की कंपनीच्या संचालक मंडळाने गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी आपल्या शेअर धारकांना 10,00,00,000 परिवर्तनीय प्रेफरंस शेअर्स 4 रुपये किमतीवर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price today on 07 September 2023.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x