28 April 2025 12:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
e Filing Income Tax | पगारदारांनो, नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 75000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन मिळणार नाही? मोठी अपडेट LIC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या सरकारी फंडात, अनेक पटीने पैसा परतावा मिळतोय, सेव्ह करून ठेवा EPFO Passbook | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPF प्रक्रियेत मोठे बदल, हक्काच्या पैशाबाबत अपडेट Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

Multibagger Stock | अजून काय हवं राव? 30 रुपयाच्या केपीआय ग्रीन एनर्जी शेअरने मागील 3 वर्षात 2844% परतावा दिला, करणार खरेदी?

Multibagger Stock

Multibagger Stock | मागील काही वर्षांत शेअर बाजारातून गुंतवणूकदारांनी भरघोस कमाई केली आहे. शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, जे पेनी स्टॉक म्हणून ट्रेड करत होते, मात्र आता ते शेअर्स हजारो रुपये किमतीवर पोहोचले आहेत. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल माहिती पाहणार आहोत. आपण ज्या स्टॉकबद्दल माहिती पाहणार आहोत, त्याचे नाव आहे, केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक. या कंपनीच्या शेअरची किंमत अल्पावधीत 30 रुपयेवरून वाढून 875 रुपये किमतीवर पोहचली आहे.

मागील 3 वर्षात या शेअरने 2844 टक्के परतावा दिला

मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2844 टक्के नफा कमावून दिला आहे. केपीआय ग्रीन एनर्जी ही कंपनी मुख्यतः सोलर एनर्जी सेक्टरमध्ये व्यवसाय करते. 3 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 30 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.046 टक्के घसरणीसह 873.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्टॉकची टेक्निकल डिटेल

टेक्निकल चार्ट पाहिल्यास आपल्याला कळेल की, KPI ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 58.3 अंकावर आहे. यावरून असे कळते की, स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. KPI ग्रीन एनर्जी स्टॉकचा वार्षिक बीटा 0.7 आहे, जो या कालावधीत कमी अस्थिरतेचे संकेत देत आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समधील सततच्या वाढीमुळे कंपनीचे बाजार भांडवल मजबूत वाढले आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 154 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 960.00 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 345.00 रुपये होती.

कंपनीची आर्थिक कामगिरी

KPI ग्रीन एनर्जी कंपनीने जून 2023 तिमाहीत 190.6 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 122.8 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून 2023 तिमाहीत केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने 33.3 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. जो मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत 22.2 कोटी रुपये नोंदवला गेला होता. कंपनीचा ऑपरेटिंग नफा जून तिमाहीत वाढून 69.3 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 41.9 कोटी रुपये ऑपरेटींग प्रॉफिट कमावला होता.

कंपनीचा व्यवसाय

केपीआय ग्रीन एनर्जी ही कंपनी मुख्यतः सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. ही कंपनी ‘सोलारिझम’ या ब्रँड नावाने स्वतंत्र ऊर्जा उत्पादक आणि कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्यूसर संबंधित सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना सौर ऊर्जा निर्मिती संबंधित सेवा देखील प्रदान करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock of KPI green energy stock price on 04 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या