22 November 2024 11:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

आमच्या उमेदवारांना मुस्लिम मते मिळाली नाहीत म्हणून पराभूत : प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar, MIM

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची समीक्षा सर्वच विरोधी पक्षाकडून सुरु आहे. त्यात अनेकांनी आपला पराभव नेमका कशामुळे झाला त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर चिंतन केल्यावर प्रकाश अमीबेडकर म्हणाले की, दलित आणि मुस्लिम हे समीकरण जसे औरंगाबादमध्ये जमून आले, तसे इतरत्र जमून आले नाही, इतर ठिकाणी मुस्लिम मते न मिळाल्यानेच वंचित बहुजन आघाडीचा मोठा पराभव झाला, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

आज अकोला येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली. दलित आणि मुस्लिम यांनी एकगठ्ठा मतदान केल्यामुळे औरंगाबादमध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले. परंतु इतर ठिकाणी असे झाले नाही. मुस्लिम मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला मते दिली नाहीत, म्हणून आघाडी हरली, असे आंबेडकर म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल १० आमदार आपल्या संपर्कात असून, संपूर्ण काँग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करण्यासाठी इच्छूक आहे, असा टोला त्यांनी हाणला. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना पुनरागमनाची सुवर्णसंधी आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही. १५३ विधानसभा मतदारसंघांत मनसेच्या चांगली कामगिरी करू शकते, अशी अशा त्यांनी व्यक्त केली.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x