25 November 2024 6:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

RailTel Share Price | मार्ग श्रीमंतीचा! फक्त एका आठवड्यात रेलटेल शेअरने 45 टक्के परतावा दिला, मल्टिबॅगरच्या दिशेने सुसाट तेजी

RailTel Share Price

RailTel Share Price | रेलटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत चढ-उतार पाहायला मिळत आहे. अवघ्या एका आठवडाभरात रेलटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकारात वाढवले आहेत. रेलटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15.50 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. स्टॉकमध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीने उत्कृष्ट तिमाही निकाल जाहीर केले आहेत. यासह ही कंपनी रेल्वे आर्मर सिस्टम विकसित करण्याच्या शक्यतांचे अवलोकन करत आहे. आज सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी रेलटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.35 टक्के घसरणीसह 233.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर किंमत इतिहास

रेलटेल लिमिटेड या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 246.70 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 94.20 रुपये होती. आहे . मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 41 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांतील या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 114 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात रेलटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 87 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 137.28 टक्के नफा मिळवून दिला आहे.

रेलटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीची आर्थिक कामगिरी खूप मजबूत आहे. 31 ऑगस्ट 2023 रोजी रेलटेल लिमिटेड या रेल्वे मंत्रालयांतर्गत व्यवसाय करणाऱ्या मिनीरत्न दर्जा प्राप्त कंपनीची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.

या एजीएममध्ये रेलटेल लिमिटेड कंपनीच्या कंपनीने माहिती दिली की माहोल पाच वर्षांत कंपनीच्या एकूण उत्पन्नात सातत्यपूर्ण वाढ पाहायला मिळाली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनी 20 अब्ज रुपये महसुल संकलित करण्याची शक्यता आहे. या कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन सध्या 50 अब्जांपेक्षा अधिक आहे.

मागील आठवड्यात रेलटेल लिमिटेड कंपनीला केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क कंपनीकडून ISP हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि परवाना पुरवठा, इंस्टॉलेशन, चाचणी, कमिशनिंग आणि देखभाल यासंबंधित केरळ राज्य माहिती तंत्रज्ञान पायाभूत सुविधां महामंडळकडून 279 दशलक्ष रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. KFON ही कंपनी केरळ राज्य सरकारच्या अधिपत्यखाली काम करणारी एक SPV म्हणून कार्य करते.

KFON चे ध्येय केरळ राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या सरकारी आस्थापनांना 30,000 इंट्रानेट / इंटरनेट कनेक्शनची सुविधा पुरवणे, 2000,000 दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत इंटरनेट सुविधा पुरवणे हे आहे. सध्या रेलटेल लिमिटेड कंपनी ‘मॉडर्न ट्रेन कम्युनिकेशन सिस्टीम्स’ आणि ‘आर्मर’ सारख्या संबंधित डोमेनमध्ये व्यवसाय करण्याची नवीन संधी तपासत आहे.

रेलटेल लिमिटेड ही कंपनी भारतातील सर्वात मोठी दूरसंचार पायाभूत सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. ही कंपनी भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. यामुळे रेलटेल लिमिटेड कंपनीला भारतीय रेल्वेच्या 60,000 किलोमीटर लांबीच्या नेटवर्कमध्ये ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचा आणि दूरसंचार सेवा प्रदान करण्याचा एकाधिकार मिळतो. रेलटेल लिमिटेड ही कंपनी रेल्वे स्टेशनवर वाय-फाय, मागणीनुसार सामग्री, रेल्वे डिस्प्ले नेटवर्क, राष्ट्रीय ज्ञान नेटवर्क सेवा प्रदान करण्याचे काम करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RailTel Share Price today on 04 September 2023.

हॅशटॅग्स

Railtel Share price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x