18 November 2024 12:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News
x

IRFC Vs RVNL Share | IRFC शेअर्स की RVNL शेअर्स? कोणता सरकारी शेअर अल्पावधीत श्रीमंत करेल? फायदा नेमका कोणत्या शेअरमध्ये?

IRFC Vs RVNL Share

IRFC Vs RVNL Share | रेल विकास निगम आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRFC कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आणि RVNL कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज RVNL चे शेअर्स जोरात आहेत. आज देखील या दोन्ही कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 57.20 रुपये किमतीवर ओपन झाले होते, आणि स्टॉक दिवसभरात 18 टक्के वाढीसह 66.50 रुपये किमतीवर पोहचला होता. आज मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स 1.59 टक्के वाढीसह 156.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

IRFC शेअरने 2 दिवसात 30 टक्के परतावा दिला

आज मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी IRFC कंपनीचे शेअर्स 8.40 टक्के वाढीसह 72.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची किंमत 20.55 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 195 टक्के वाढले आहेत. IRFC कंपनीच्या शेअरने पहिल्या 2 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 86,000 कोटी रुपये आहे. IRFC कंपनीच्या शेअर्सची किंमत जुलै 2023 नंतर 32.35 रुपयेवरून वाढून सध्याच्या किंमत पातळीवर पोहचली आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये RVNL कंपनीचे शेअर्स 141.95 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आणि दिवस भरात हा स्टॉक 158 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील एका वर्षात RVNL कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 371 टक्के नफा कमावून दिला आहे. RVNL या रेल्वे पायाभूत क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स 32.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 5 पट अधिक वाढले आहेत.

आरव्हीएनएल शेअरच्या किंमतीचा इतिहास

आरव्हीएनएलच्या शेअरने गेल्या १२ महिन्यांत (५ सप्टेंबर २०२२ पासून) जवळपास ३७० टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. त्या तुलनेत निफ्टी ५० हा प्रमुख निर्देशांक जवळपास ११ टक्क्यांनी वधारला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs RVNL Share price today on 05 September 2023.

हॅशटॅग्स

IRFC Vs RVNL Share(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x