RVNL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! RVNL शेअरने एका वर्षात 355 टक्के परतावा दिला, तर मागील 5 दिवसात 28 टक्के परतावा दिला
RVNL Share Price | RVNL म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये तेजी मंदीचे चक्र पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून RVNL स्टॉक मजबूत तेजीत वाढत होता. मात्र काल या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत होती. RVNL कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5.57 टक्के वाढीसह 163 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.
यापूर्वी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये RVNL स्टॉक 17.22 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. 2023 या वर्षात RVNL कंपनीचे शेअर्स तब्बल 136.32 टक्के वाढले आहेत. मागील वर्षी या कंपनीच्या शेअरने लोकांना 391.65 टक्के नफा कमावून दिला होता. काल गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी RVNL शेअर्स 4.54 टक्के वाढीसह 156.65 रुपये (NSE सकाळी 9:30 वाजता) किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स 1.56 टक्के वाढीसह (सकाळी १०:०० वाजता) 156.30 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
मागील पाच दिवसांत RVNL कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 21 टक्के परतावा कमावून दिला आहे. आणि मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. RVNL कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ एका घोषणेनंतर पाहायला मिळाली आहे.
या कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये कळवले आहे की, कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा 27 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. आणि नुकताच कंपनीला मध्य गुजरात विज कंपनी लिमिटटेड कडून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 322.08 कोटी रुपये असून त्याची पूर्तता 31 महिन्यांत करायची आहे.
शेअर बाजारातील तज्ञांनी RVNL कंपनीच्या शेअरवर 175 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. भारतीय रेल्वेचा भांडवली खर्च 2,40,000 कोटी रुपयेवर पोहोचला आहे, जो 2014 च्या रेल्वे अर्थसंकल्पाच्या तुलनेत नऊ पट अधिक आहे. म्हणून सर्व रेल्वे कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
RVNL कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढली आहे, तरीही गुंतवणुकदारस्टॉक खरेदी करत आहेत. म्हणून पुढील काळात जा स्टॉक आणखी तेजीत येऊ शकतो असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. दैनंदिन चार्टवर RVNL स्टॉकमध्ये 167.70 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | RVNL Share Price today on 08 September 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार