23 November 2024 8:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सराफा बाजारात सोन्याचे भाव जोरदार खाली घसरले, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. गुरुवारी सराफा बाजारासह मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजमध्येही घसरण पाहायला मिळत आहे. मागील सत्रात सोने 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 68,000 रुपयांवर बंद झाली होती. (Gold Price Today)

एमसीएक्सवर सोन्याच्या दरात घसरण

गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. दुपारनंतर सोन्याचा भाव 112 रुपयांनी घसरून 58976 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 292 रुपयांनी घसरून 72180 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. एमसीएक्सवर बुधवारी सोने 59088 रुपये आणि चांदी 72472 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात किती घसरण?

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून (आयबीजेए) सराफा बाजाराचे दर जाहीर केले जातात. आयबीजीएने आज गुरुवारी दुपारी https://ibjarates.com केलेल्या वेबसाइटवर जाहीर केलेल्या दरानुसार सोन्या-चांदीत घसरण झाली. गुरुवारी सोन्याचा भाव 200 रुपयांनी घसरून 59,125 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 900 रुपयांनी घसरून 71,180 रुपये प्रति किलो ग्रॅम झाला.

याआधी बुधवारी सोन्याचा भाव 59329 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 72065 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. गुरुवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव 48,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आज उच्चांकी पातळीपेक्षा सोनं किती स्वस्त?

सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 2,460 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते. तर चांदीचा भाव 71180 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 72065 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रति किलो 885 रुपयांची घसरण झाली आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 07 September 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x