25 November 2024 11:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN
x

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग कंपनीवर मोठ्या ऑर्डर्सचा वर्षाव, 55 रुपयेचा शेअर तुफान तेजीत येणार? काय आहे अपडेट्स?

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | मागील काही दिवसापासून पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स मजबूत कामगिरी करत आहेत. मात्र आता स्टॉकमधील तेजी कमी होत चालली.आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के वाढीसह 57.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील सहा महिन्यांत पटेल इंजिनिअरिंग स्टॉकची किंमत 214.61 टक्के मजबूत झाली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 218.73 टक्के वाढली आहे.

या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळाल्या आहेत. बुधवारी कंपनीने माहिती दिली की, कंपनीला मध्य प्रदेश राज्य सरकारने एक मोठी ऑर्डर दिली आहे. आज शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी पटेल इंजिनिअरिंग स्टॉक 0.81 टक्के घसरणीसह 55.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

पटेल इंजिनिअरिंग कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला, मध्यप्रदेश राज्य सरकारने एमपी जल बोर्ड प्रकल्पाच्या प्रकल्पासाठी 1,275.30 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरमध्ये पटेल इंजिनिअरिंग कंपनीचा वाटा 35 टक्के म्हणजेच जवळपास 446 कोटी रुपये असेल. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंपनीला 24 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

पटेल इंजिनीअरिंग कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना संयुक्त उपक्रम म्हणून दिबांग बहुउद्देशीय प्रकल्प उभारणीचे काम मिळाले आहे. या ऑर्डरमध्ये हेड रेस बोगदा, इनटेक, प्रेशर शाफ्ट, पेनस्टॉक्स, पॉवर हाऊस आणि ट्रान्सफॉर्मर केव्हर्न, टेल रेस बोगदा पॉटहेड यार्ड, एडिट्स यांचे बांधकाम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशमधील हा प्रकल्पाचे मूल्य 3637.15 कोटी रुपये असून तो पूर्ण करण्यासाठी कंपनीला 86 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

नुकताच पटेल इंजिनीअरिंग कंपनीला मध्यप्रदेश राज्य सरकारकडून जी ऑर्डर मिळाली होती, तिचे एकूण मूल्य 1,275.30 कोटी रुपये आहे. ही ऑर्डर कंपनीला एमपी जल बोर्ड तर्फे देण्यात आली आहे. पटेल इंजिनियरिंग लिमिटेड ही कंपनी 74 वर्षापुर्वी 1949 साली स्थापन झाली होती. ही कंपनी जलविद्युत आणि धरण प्रकल्पांचे बांधकाम करण्यासाठी एक्स्पर्ट मानली जाते. या कंपनीने आतपर्यंत एकूण 85 पेक्षा जास्त धरणे, 40 पेक्षा जास्त जलविद्युत प्रकल्प, आणि 300 किमी पेक्षा जास्त लांबीचे बोगदे बनवले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Patel Engineering Share Price today on 08 September 2023.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x