29 December 2024 2:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर सह हे 3 शेअर्स 'पॉवर' दाखवणार, कमाईची मोठी संधी सोडू नका - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन सहित या 3 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत परतावा मिळणार - NSE: SUZLON Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा ग्रुपचा IPO येतोय, अशी संधी वारंवार मिळणार नाही, तपशील नोट करा - GMP IPO IRFC Share Price | IRFC सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धना मदरसन शेअर फोकसमध्ये, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: MOTHERSON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
x

Jeetega INDIA | 7 पोटनिवडणूकीचे निकाल, युपी-झारखंड ते प. बंगाल 'इंडिया' आघाडीची लाट, युपी-घोसी जागा भाजप मोठ्या फरकाने हरणार

By Poll Election Results

Jeetega INDIA | देशात इंडिया आघाडी आणि एनडीए युतीच्या शक्तिप्रदर्शना दरम्यान 6 राज्यांच्या 7 विधानसभा जागांवरील पोटनिवडणुकीचे निकाल आगामी लोकसभा निवडणुकीचे संकेत देणारे आहेत. कारण भाजपने एकूण 7 पैकी 3 जागा जिंकल्या असल्या तरी त्या जवळपास एकतर्फी आणि अनुकूल असलेल्या त्रिपुरा तसेच उत्तरांचल मध्ये जिंकल्या आहेत. त्या जागा जिंकताना देखील भाजप उमेदवारांना तगडी टक्कर देण्यात आली.

परंतु संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशातील घोसीमधून भाजपाला समाजवादी पक्षाने मोठा धक्का दिला आहे. या मतदारसंघात स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील तब्बल १२ कॅबिनेट मंत्री प्रचारादरम्यान तळ ठोकून होते.

तरी देखील भाजपचे तगडे उमेदवार दारासिंह चौहान मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. उत्तर प्रदेश घोसी मध्ये सपाचे सुधाकर सिंह 25 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलेले दारासिंह चौहान दुसऱ्या क्रमांकावर आहेत. उत्तर प्रदेशातील घोसी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार न देता सपा’ला मदत केल्याचं पाहायला मिळालं आहे.

याशिवाय टीएमसी, काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चालाही प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. उत्तर प्रदेशातील घोसी विधानसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचा मोठ्या फरकाने विजय होणार हे आकडेवारीतून स्पष्ट होतंय. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना देखील हा मोठा धक्का मानलं जातंय. लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना आणि उत्तर प्रदेश भाजपसाठी महत्वाचं असताना या निकालाने भाजपला धडकी भरल्याची चर्चा सुरु झाली आहे.

News Title : By poll election results on Uttar Pradesh Ghosi BJP Samajwadi Party Congress 08 Sept 2023 Marathi news.

हॅशटॅग्स

#By Poll Election Results(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x