18 November 2024 8:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON
x

IRFC Vs RVNL Vs Jupiter Share | मार्ग श्रीमातीचा! होय, IRFC आणि RVNL शेअर्सप्रमाणे अजून एक रेल्वेसंबंधित शेअर मल्टिबॅगर परतावा देतोय

IRFC Vs RVNL Vs Jupiter Share

IRFC Vs RVNL Vs Jupiter Share | रेल्वे आणि संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये सध्या बरीच तेजी पाहायला मिळत आहे. सध्या गुंतवणूकदार IRFC आणि RVNL शेअर्सवर केंद्रित असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र हुशार गुंतवणूकदार IRFC आणि RVNL शेअर्ससहित रेल्वे वॅगन उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्येही प्रचंड केंद्रित झाल्याने हा शेअर सुद्धा तेजीत आहे. ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे.

एका महिन्यात 60 टक्क्यांहून अधिक परतावा

एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 60 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड मेटल फॅब्रिकेशन ची निर्मिती करते. याशिवाय कंपनी रेल्वे मालवाहतूक, वॅगन आणि कंपोनेंट्सचाही व्यवहार करते.

अल्पावधीत मोठा परतावा

ज्युपिटर वॅगन्सच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना एका महिन्यात ६० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 10 ऑगस्टरोजी कंपनीचा शेअर 235 रुपयांच्या पातळीवर होता आणि आज हा शेअर 378.5 रुपयांच्या पातळीवर आहे. एका महिन्याच्या कालावधीत हा शेअर १४३.२० रुपयांनी वधारला आहे.

YTD आधारावर शेअर्सने 292 टक्के परतावा दिला

6 महिन्यांच्या कालावधीत कंपनीच्या शेअरमध्ये 278.17 टक्के म्हणजेच 278.45 रुपयांची वाढ झाली आहे. 10 मार्च रोजी या कंपनीचा शेअर 100 रुपयांच्या पातळीवर होता. याशिवाय वायटीडी वेळेत हा शेअर 292.89 टक्क्यांनी वधारला आहे. या कालावधीत हा शेअर 282.20 रुपयांनी वधारला आहे.

ज्युपिटर वॅगन्स शेअर्सची 52 आठवड्यांची पातळी

या शेअरची 52 आठवड्यांची विक्रमी पातळी 396.00 आहे. तर नीचांकी पातळी 369.55 वर आहे. 22 ऑगस्ट 2022 रोजी ज्युपिटरचा शेअर 60 रुपयांच्या जवळपास होता. तर आता या शेअरनेही 370 चा टप्पा ओलांडला आहे.

कंपनीच्या विक्रीत किती वाढ झाली?

ज्युपिटर वॅगन्सच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांबद्दल बोलायचे झाले तर चालू आर्थिक वर्षात कंपनीची विक्री १५५ टक्क्यांनी वाढून ७५३ कोटी झाली आहे. तर, नफा ३८५ टक्क्यांनी वाढून ६३ कोटी ंवर पोहोचला आहे.

ही कंपनी रेल्वेसाठी वॅगन तयार करते

ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड ही रेल्वेसाठी वॅगन बनवणारी मोठी कंपनी आहे. सध्या ज्युपिटर वॅगनची वार्षिक ७४०० वॅगन तयार करण्याची क्षमता आहे. कंपनीला या वर्षाच्या अखेरपर्यंत आपली क्षमता ८४०० वॅगनपर्यंत वाढवायची आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : IRFC Vs RVNL Vs Jupiter Share Price check details 10 September 2023.

हॅशटॅग्स

#IRFC Vs RVNL Vs Jupiter Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x