23 December 2024 2:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON SBI Mutual Fund | डोळे झाकून SIP करा या SBI फंडाच्या योजनेत, 1 लाख रुपयांचे होतील 5 लाख रुपये, मार्ग श्रीमंतीचा Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर
x

Suzlon Share Price | एका वर्षात 147 टक्के परतावा देणारा सुझलॉन एनर्जी शेअर लोअर सर्किटवर, स्वस्तात खरेदी करावा?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये बरीच उलथापालथ पाहायला मिळत आहे. आज या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे.

याकाळात शेअरची किंमत 8 रुपयेवरून वाढून 22.80 रुपयेवर पोहचली आहे. मात्र काल आणि आज या स्टॉकमध्ये लोअर सर्किट लागत आहे. आज बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.82 टक्के घसरणीसह 21.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सुझलॉन एनर्जी शेअर्सची स्थिती

सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के घसरणीसह 22.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 113.08 टक्के नफा कमावून दिला आहे. आणि मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 13.72 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 5 वर्षांत या शेअरने 254.59 टक्के परतावा दिला

मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 254.59 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 6 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचली आहे. 2008 मध्ये या कंपनीचे शेअर्स 337 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 2008 मधील किमतीच्या तुलनेत 94 टक्के कमजोर झाला आहे.

तज्ज्ञांचे मत

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने नुकताच जाहीर केलेल्या अहवालात म्हंटले आहे की, भारत सरकारने आपले अक्षय ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आर्थिक वर्ष 2030 पर्यंत वार्षिक 8 GW पवन ऊर्जा निर्मिती क्षमता वाढवण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. अशा परिस्थितीत हे लक्ष साध्य करण्यासाठी सुझलॉन एनर्जी कंपनीला पवन निर्मिती क्षेत्रात लक्षणीय बाजारपेठ मिळू शकते. आणि पुढील काळात सुझलॉन एनर्जी कंपनीचा व्यवसाय आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 13 September 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(277)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x