19 April 2025 7:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

पहले सरकार, फिर मंदिर...उद्धव ठाकरे १६ जूनला अयोध्येला जाणार

Shivsena, uddhav thackeray, sanjay raut, bjp maharashtra, bjp, ayodhya, pehle mandir fir sarkar

लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत फार काही अलबेल नव्हतं. उद्धव ठाकरे लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी सतत भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसले, परंतु पुन्हा दिलजमाई करत दोघेही सोबतच निवडणूक लढले. २०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींना कोंडीत पकडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता आणि त्यावेळी “पेहले मंदिर फिर सरकार” असा नारा देत भाजप विरुद्ध उघड-उघड रणशिंगच फुंकलं होतं.

उद्धव ठाकरेंची हि घोषणा संपूर्ण देशभर गाजली, तसेच या आशयाचे होर्डिंग्स संपूर्ण महाराष्ट्रभर लावून शिवसेनेने चांगलीच वातावरण निर्मिती केली होती. परंतु आपणच दिलेली घोषणा विसरून आणि शिवसैनिकांना युती न करण्याचे वचन मोडून सत्तेसाठी भाजपसोबत हातमिळवणी केली. मंदिराआधीच केंद्रात सरकार बनले आणि शिवसेना १८ खासदारांसह त्यात सहभागी देखील झाली. नव्या सरकारमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या वाट्याला दुय्यम खाते आले.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली आहे. त्यानुसार, येत्या १६ जूनला विजयी खासदारांसह उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल होणार आहेत. महाराष्ट्रात होऊ ठाकलेल्या २०१९ च्या विधानसभेची ही पूर्वतयारीच असावी. उत्तर भारतीय मतदाराला खुश करून महाराष्ट्रातील उत्तर भारतीय मतदानाचा टक्का स्वतः कडे वळवण्याचं राजकारण शिवसेना करताना दिसत आहे. तसेच शिवसेना-भाजपचा विधानसभेचा ५०-५० चा फॉर्मुला ठरला आहे. भाजप आपल्या वाटेच्या १८ जागा मित्रपक्षांसाठी सोडणार असले तरी स्वतःच्या जागा कमी होणार नाहीत याची ते योग्य काळजी घेतील हे नक्की.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी जागा कमी पडल्यास मित्रपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असून मित्रपक्षांचा कौल भाजपच्या बाजूनेच राहणार असल्याने शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर धर्मसंकट उभं राहिल्यानेच उद्धव यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा पुढे करून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं सांगण्यात येतं. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव यांचा हा अयोध्या दौरा असल्याचंही राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या