22 November 2024 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

महागाई-बेरोजगारीकडे दुर्लक्ष, सतत हिंदू-मुस्लिम-पाकिस्तान-धार्मिक तेढ वाढवणाऱ्या बातम्या, इंडिया आघाडी 'गोदी मीडिया'चा बॉयकॉट करणार

INDIA alliance

INDIA Alliance | काही दूरचित्रवाणी अँकर्सनी आयोजित केलेल्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपले नेते आणि प्रवक्ते पाठविणे बंद करण्याचा निर्णय विरोधी पक्ष असलेल्या ‘INDIA आघाडी’ने घेतला आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी झालेल्या भारतीय समन्वय समितीच्या बैठकीनंतर संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, ज्या टीव्ही अँकर्सच्या कार्यक्रमांवर INDIA आघाडीचा कोणताही पक्ष आपले प्रतिनिधी पाठवणार नाही, त्यांची नावे ठरविण्याचे अधिकार समन्वय समितीने माध्यमांवरील उपगटाला दिले आहेत.

हिंदू-मुस्लिम आणि पाकिस्तान केंद्रित चर्चा

टीव्ही वृत्तवाहिन्यांवर हिंदू-मुस्लिम आणि पाकिस्तान केंद्रित चर्चा घडवून लोकांमध्ये धार्मिक द्वेष निर्माण करणे हाच गोदी मीडियाचा एककलमी कार्यक्रम मागील अनेक वर्ष सुरु आहे. मोदी सरकारला सत्ताधारी म्हणून कोणताही प्रश्न गोदी मीडिया विचारात नाही, उलट विरोधकांना धर्मावरून प्रश्न विचारण्याच्या चर्चा ठरवून त्यांच्या वृत्त वाहिन्यांवर घडवून आणतात आणि मोदी सरकारसाठी लोकांमध्ये राजकीय वातावरण निर्मिती करतात हाच कार्यक्रम पाहायला मिळतो आहे. विशेष म्हणजे सामान्य लोकांशी संबधित महागाई, बेरोजगारी तसेच अनेक सरकारी घोटाळ्यांवर या वृत्त वाहिन्या चकार शब्द देखील काढताना दिसत नाहीत.

सत्तेचे एजंट म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांना शोधून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संपूर्ण विरोधी गटाने बहुधा पहिल्यांदाच घेतला आहे. सूत्रांनी सांगितले की, काही मीडिया हाऊसवर पूर्णपणे बहिष्कार टाकला जाईल तर इतर वाहिन्यांवरील विशिष्ट अँकरच्या कार्यक्रमांना टाळले जाईल. RSS-भाजपचे ‘शिकारी’ म्हणून काम करणाऱ्या किमान तीन प्रसारमाध्यमांशी संबंध तोडून दुरावा करण्यात येणार आहे, यावर INDIA आघाडीच्या सर्व पक्षांमध्ये एकमत आहे.

अँकर आणि टीव्ही चॅनल्सची नावे जाहीर

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ‘गोदी मीडिया’बद्दल आणि समाजवादी पक्षाचे नेते जावेद अली खान यांनी ‘समाजात द्वेष पसरवणाऱ्या या अँकर्स’कडे लक्ष वेधले.

एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, आम्ही गेल्या काही आठवड्यांमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा केली. वैयक्तिक नावांवर चर्चा झाली. ते केवळ संघ-भाजपचा बचाव करतात आणि विरोधकांवर हल्ला करतात असे नाही, तर ते समाजात विष पसरविण्याच्या स्पष्ट अजेंड्यावर काम करतात. ते असे विषय आणि घटना निवडतात ज्याचा वापर सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यासाठी आणि दररोज प्रचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. हा केवळ राजकीय पक्षपातीपणाचा विषय नाही; ही अनैतिक पत्रकारिता असून त्याकडे प्रसारमाध्यमांनीही लक्ष द्यायला हवे.

News Title : INDIA alliance decides to steer clear of Godi Media 14 September 2023.

हॅशटॅग्स

#INDIA Alliance(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x