23 November 2024 5:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Pramara Promotions IPO | मार्ग श्रीमंतीचा! प्रमारा प्रमोशन्स IPO शेअरची प्राईस बँड 63 रुपये, पहिल्याच दिवशी 76 टक्के परतावा मिळेल

Pramara Promotions IPO

Pramara Promotions IPO | बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी शेअर बाजारात प्रमारा प्रमोशन्स कंपनीच्या शेअरची जबरदस्त लिस्टिंग पाहायला मिळाली आहे. प्रमारा प्रमोशन्स या प्रमोशनल उत्पादने आणि भेटवस्तू तयार करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने मजबूत लिस्टिंग नोंदवून गुंतवणूकदारांना देखील हैराण केले आहे.

प्रमारा प्रमोशन्स कंपनीचे IPO शेअर्स 111 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 63 रुपये निश्चित केली होती. आणि शेअरची लिस्टिंग 76.19 टक्के प्रीमियम किमतीवर झाली आहे.

स्टॉक लिस्टिंग झाल्यानंतर देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 85 टक्के नफा मिळाला आहे. आज गुरूवार दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी प्रमारा प्रमोशन्स कंपनीचे शेअर्स 3 टक्के घसरणीसह 113 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

IPO ला उत्कृष्ट प्रतिसाद

प्रमारा प्रमोशन्स कंपनीच्या IPO ला गुंतवणुकदारांनी मजबूत प्रतिसाद दिला होता. 5 सप्टेंबर 2023 रोजी प्रमारा प्रमोशन्स कंपनीच्या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 17.01 पट अधिक खरेदी करण्यात आला होता. तर नॉन रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या कोटात 33.96 पट अधिक बोली प्राप्त झाली होती.

प्रमारा प्रमोशन कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बँड 63 रुपये जाहीर केली होती. कंपनीने एका लॉटमध्ये 2000 शेअर्स जारी केले होते. गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 1,26,000 रुपये जमा करावे लागले होते.

कंपनीबद्दल थोडक्यात

प्रमारा प्रमोशन्स ही कंपनी मुख्यतः प्रमोशनल मार्केटिंग एजन्सी म्हणून काम करते. या कंपनीची स्थापना 2006 साली झाली होती. ही कंपनी आपल्या ग्राहकांना प्रमोशनल उत्पादने आणि भेटवस्तूंच्या डिझाईन, संकल्पना, उत्पादन आणि विपणन या संबंधित सेवा प्रदान करण्याचे काम करते.

प्रमारा प्रमोशन्स कंपनीच्या ग्राहकांमध्ये फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणजेच FMCG, QSR म्हणजेच क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स, फार्मा कंपन्या, बेव्हरेज कंपन्या, कॉस्मेटिक्स, टेलिकॉम आणि मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपन्या आहे. प्रमारा प्रमोशन्स कंपनी OEM व्यवस्था अंतर्गत उत्पादने तयार करण्याचे काम देखील करते. प्रमारा प्रमोशन लिमिटेड कंपनीने आतापर्यंत 5,000 पेक्षा जास्त उत्पादनांची निर्मिती केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Pramara Promotions IPO for investment on 14 September 2023.

हॅशटॅग्स

Pramara Promotions IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x