22 November 2024 10:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो बायबॅक करणार, या तारखेपासून गुंतवणूकदारांना फायदा घेता येईल, प्रति शेअर फायदा किती?

L&T Share Price

L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो या कंपननीने बायबॅक स्कीम जाहीर केली होती. 18 सप्टेंबर 2023 पासून कंपनी बायबॅक सुरू करेल. यामध्ये कंपनीच्या गुंतवणूकदारांना मजबूत माफ कमावण्याची संधी मिळणार आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीने आपल्या बायबॅकसाठी 3000 रुपये प्रति शेअर किंमत निश्चित केली होती. मात्र नंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी आल्याने शेअरची किंमत वाढली.

आता कंपनीने आपल्या बायबॅकसाठी प्रति शेअर किंमत 3,200 रुपये जाहीर केली आहे. या योजनेत हे गुंतवणुकदार स्टॉक विकतील त्यांना 300 रुपये प्रति शेअर नफा मिळू शकतो. आज शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के घसरणीसह 2,906.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

लार्सन अँड टुब्रो कंपनीने बायबॅकची रेकॉर्ड तारीख म्हणून 12 सप्टेंबर 2023 हा दिवस निश्चित केला होता. म्हणजेच 12 सप्टेंबर 2023 पर्यंत ज्या गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात कंपनीचे शेअर्स असतील, त्यांना बायबॅकच फायदा मिळेल. या बायबॅकसाठी लार्सन अँड टुब्रो कंपनीने 10,000 कोटी रुपयेच निधी जाहीर केला होता. लार्सन अँड टुब्रो कंपनीने बायबॅक ऑफर जाहीर केल्या नंतर कंपनीचे शेअर्स आणखी तेजीत आले आहेत.

मागील एका आठवड्यात लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअरची किंमत 2.52 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 8.02 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअरची किंमत 23.91 टक्के वाढली आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 49.35 टक्के वाढली आहे. मागील 3 वर्षांतलार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 223.48 टक्के नफा कमावून दिला आहे.

बायबॅक ऑफरचे संपूर्ण तपशील :
* रेकॉर्ड तारीख : 12 सप्टेंबर 2023
* बायबॅक सुरू होण्याची तारीख : 18 सप्टेंबर 2023
* प्रति शेअर बायबॅक किंमत : 3200 रुपये
* बायबॅकचा आकार : 10,000 कोटी रुपये
* बायबॅकला मंजुरी : 25 जुलै 2023
* बायबॅक घोषणा तारीख : 25 जुलै 2023
* बायबॅक ऑफर आकार : 2.22 टक्के
* बायबॅक स्टॉक संख्या : 3,12,50,000
* बायबॅकची पद्धत : टेंडरद्वारे केली जाणार
* शेअरचे दर्शनी मूल्य : 2 रुपये

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | L&T Share Price today on 15 September 2023.

हॅशटॅग्स

L&T Share Price(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x