27 April 2025 6:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या सरकारी फंडात, अनेक पटीने पैसा परतावा मिळतोय, सेव्ह करून ठेवा EPFO Passbook | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPF प्रक्रियेत मोठे बदल, हक्काच्या पैशाबाबत अपडेट Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Motherson Sumi Share Price | 55 रुपयांच्या शेअरबाबत महत्वाची अपडेट; शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MSUMI
x

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी महत्वाची अपडेट, बँक FD आणि इतर ठेवींच्या व्याजदरांमध्ये बदल, किती फायदा?

Bank of Maharashtra

Bank of Maharashtra | सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर उत्पन्नासाठी मुदत ठेवींमध्ये (एफडी) गुंतवणूक करणे ही आजही बहुतांश लोकांची पहिली पसंती आहे. या पार्श्वभूमीवर बँक ऑफ महाराष्ट्रने कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात मोठे बदल केले आहेत. बँकेच्या अनेक ग्राहकांना याबद्दल अजून कल्पना नाही.

व्याजदरात झालेल्या या वाढीनंतर बँक 7 दिवस ते 5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर आधी आणि सध्या मिळणारे व्याज दर बदलले आहेत. तर बँकेने 200 दिवसांची नवीन एफडी लाँच केली आहे जिथे ग्राहकांना सर्वाधिक व्याज मिळत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, वाढलेले नवे व्याजदर खाली देण्यात आले आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्र एफडीचे बदललेले व्याज दर

* बँक ऑफ महाराष्ट्र 7 दिवस ते 30 दिवसांच्या एफडीवर 2.75 टक्के
* 31 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के
* 46 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 3.50 टक्के
* 91 दिवस ते 119 दिवसांच्या एफडीवर 4.50 टक्के व्याज देत राहील.
* 130 दिवस ते 180 दिवसांच्या एफडीवर 4.75 टक्के
* 181 दिवस ते 270 दिवसांच्या एफडीवर 5.35 टक्के (यापूर्वी 5.35 होता)
* 271 दिवस ते 364 दिवसांच्या एफडीवर 5.60 टक्के (यापूर्वी 5.50 होता)
* 365 दिवस ते 1 वर्षाच्या एफडीवर 6.35 टक्के (यापूर्वी 6.15 होता)
* 1 वर्षाहून अधिक ते 2 वर्षांच्या एफडीवर 6 टक्के
* 2 वर्षाहून अधिक ते 3 वर्षे कालावधीच्या एफडीवर 6% व्याज देईल
* 3 वर्षाहून अधिक ते 5 वर्षे कालावधीच्या एफडीवर 5.75% व्याज देईल
* 5 वर्षाहून अधिक कालावधीसाठी 5.75% व्याज देईल

या कालावधीतील एफडीवर सर्वाधिक व्याज – (Special Schemes*)

बँक ऑफ महाराष्ट्रने 200 दिवसांच्या कालावधीची नवीन एफडी लॉन्च केली आहे ज्यात ग्राहकांना जास्तीत जास्त 7% व्याज मिळेल.

बँक ऑफ महाराष्ट्र महाधनवर्ष व्याजदर (Maha Dhanvarsha Fixed Deposit Scheme)

बँकेने या विशेष एफडी योजनेला महा धनवर्षा मुदत ठेव योजना असे नाव दिले आहे. या योजनेअंतर्गत बँकेच्या सर्वसामान्य नागरिकांना 400 दिवसांच्या एफडीवर 6.75% टक्के व्याज मिळते. तर, ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत अतिरिक्त 0.50 टक्के परतावा मिळतो

बँक आपल्या निवासी ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 91 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या सर्व एफडीवर अतिरिक्त 0.50% व्याज देईल. बँकेच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना दोन कोटीरुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीवर ९१ दिवसांवरील एफडीवर व्याज मिळणार आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Bank of Maharashtra FD Term Deposit interest rates 16 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या