22 December 2024 8:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Patel Engineering Share Price | मालामाल शेअर! 55 रुपयाचा मल्टिबॅगर पटेल इंजिनीअरिंग शेअर अप्पर सर्किटमध्ये, आता 'या' बातमीने तेजी

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. दिवसभरात या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 55.40 रुपये किमतीवर पोहचले होते.

पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये अचानक तेजी येण्याचे कारण म्हणजे, कंपनीने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळासोबत संयुक्त उपक्रम स्थापन करून 249.96 कोटी रुपये मूल्याच्या प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 55.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सविस्तर तपशील

पटेल इंजिनिअरिंग कंपनीने कृष्णा खोरे विकास महामंडळासोबत संयुक्त उपक्रम स्थापन करून जो प्रकल्प मिळवला आहे, त्यात कंपनीचा वाटा 40 टक्के म्हणजेच 99.98 कोटी रुपये आहे. या प्रोजेक्टमध्ये नीरा देवघर उजव्या काठाच्या मुख्य कालव्यासाठी 66 ते 76 किमीपर्यंत पाइपलाइन वितरक नेटवर्क बांधण्याचे काम करणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 30 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

हा प्रकल्प महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील वाघोशी ते कापडगाव या ठिकाणी आहे. सप्टेंबर 2023 मध्ये पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीला आपल्या JV सह 1,275.30 कोटी रुपये मूल्याची पायाभूत विकास प्रकल्प संबंधित काम मध्य प्रदेश जल निगमकडून देण्यात आले होते. ही कंत्राटे ऑगस्ट 2023 मध्ये देण्यात जारी करण्यात आली होती.

पटेल इंजिनीअरिंग कंपनी त्यांच्या जॉइंट व्हेंचरला Lot-4 च्या सिव्हिल वर्कसाठी NHPC लिमिटेड कंपनीने देखील बहुराष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी दिली होती. या प्रोजेक्टमध्ये कंपनीचा वाटा 1,818.56 कोटी रुपये आहे. मध्य प्रदेश सरकारच्या उपक्रमा अंतर्गत अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम, चाचणी, कमिशनिंग ट्रायल रन आणि ऑपरेशन आणि देखभाल हे सर्व काम करण्यासाठी पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी कंपनीला 10 वर्ष कालावधीसाठी 1,275.30 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे. या प्रोजेक्टमध्ये पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीचा प्रत्यक्ष वाटा 35 टक्के म्हणजेच 446.36 कोटी रुपये असेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Patel Engineering Share Price today on 16 September 2023.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x