चारही राज्यांमध्ये मोदी शहांच्या सभांमध्ये खाली खुर्च्या, तर तेलंगणातही काँग्रेसची हवा, BRS ची सत्ता जाण्याचे संकेत, राहुल गांधींच्या विराट सभा
Congress Telangana Rally | पावसाळा संपताच देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभा एकत्र होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपने आधीच प्रचार सभांचा सपाटा सुरु केला आहे. आगामी विधानसभा निवणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्य काँग्रेससाठी पोषक असल्याचे संकेत मिळत असताना दुसऱ्याबाजूला भाजपच्या मोदी-शहांच्या सभांना त्यांचं भाषण सुरू असताना खाली खुर्च्या पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या सभांना विराट गर्दी जमत असल्याचं पाहायला मिळत असल्याने मतदारांचा कल स्पष्ट होतोय.
विशेष म्हणजे तेलंगणामध्ये BRS चा दारुण पराभव होऊन काँग्रेस बहुमताने सत्ता स्थापन करेल असे स्थानिक माध्यमांचे सर्व्हे सांगत आहेत. तसेच तेलंगणात जनतेची काँग्रेसच्या सभांना होणारी गर्दी देखील अभूतपूर्व असल्याचं पाहायला मिळतंय. BRS ही भाजपाची बी टीम असल्याचा नॅरेटिव्ह देखील स्थापित होताना दिसतोय. त्यात काँग्रेसच्या ‘सहा गॅरेंटी कार्ड’ने जनतेच्या अपेक्षा वाढल्याचं म्हटलं जातंय.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी आज म्हणजे रविवारी तेलंगणात जाहीर सभा घेतली. समाजातील सर्व घटकांसाठी काम करणारे पक्षाचे सरकार राज्यात असावे, हे माझे स्वप्न असल्याचे त्या म्हणाले. हैदराबादजवळील तुक्कुगुडा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, आम्ही सहा हमी जाहीर करत आहोत आणि आम्ही प्रत्येक हमी पूर्ण करण्यास कटिबद्ध आहोत. त्यांनी ‘महालक्ष्मी’ योजनेची हमी जाहीर केली. याअंतर्गत काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर तेलंगणातील महिलांना दरमहा 2500-2500 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
५०० रुपयांत गॅस सिलिंडर आणि महिलांना बसने मोफत प्रवास
सोनिया गांधी यांनी ५०० रुपयांत गॅस सिलिंडर आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाची घोषणा केली. तेलंगणमध्ये काँग्रेसचे सरकार असावे, जे सर्व घटकांसाठी काम करेल, असे माझे स्वप्न आहे. सोनिया गांधी यांनी जनतेला काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले.
त्याचवेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हैदराबादमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, प्रत्येक विरोधी पक्षनेत्यावर गुन्हा दाखल आहे. ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग सर्व विरोधी पक्षनेत्यांच्या मागे आहेत, पण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवर कोणताही गुन्हा नाही, एमआयएमच्या नेत्यांवर गुन्हा नाही.
बीआरएसने भाजपला प्रत्येक वेळी पाठिंबा दिला : राहुल गांधी
‘नरेंद्र मोदी कधीही त्यांच्या जवळच्या नेत्यांवर राजकीय हल्ला करत नाहीत. कारण ते तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना आणि एमआयएमला देखील आपलं मानतात, त्यामुळे त्यांच्यावर ED-CBI कोणतीही कारवाई किंवा गुन्हा दाखल करत नाही. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडले आहेत, पण त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही.
तेलंगणातील काँग्रेस पक्ष केवळ बीआरएस पक्षाशी लढत नाही तर काँग्रेस बीआरएस, भाजप, एआयएमआयएम विरोधात लढत आहे. ते स्वत:ला वेगवेगळे पक्ष म्हणवून घेतात पण ते सर्व एकत्र काम करत आहेत आणि जनतेच्या मतांमध्ये फूट पडून निवडणूक जिंकण्यासाठी काम करतात. भाजपला जेव्हा जेव्हा बीआरएसची गरज होती, तेव्हा तेव्हा BRS नेत्यांनी भाजपाला पूर्ण पाठिंबा दिला.
केसीआर यांचा पक्ष भाजपची बी टीम : खर्गे
यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला. एकीकडे मोदी, दुसऱ्या बाजूला केसीआर, हे दोन्ही आतून मिसळलेले आहेत, दोन्ही बाहेरून दिसायला वेगळे आहेत. केसीआर यांचा पक्ष ही भाजपची बी टीम आहे. ते त्यांची बी टीम आहेत, त्यामुळे भाजप त्यांना मदत करत आहे.
यापूर्वी काँग्रेसने भाजप आणि बीआरएस राज्य सरकारवर तेलंगणाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला होता आणि ‘सोनेरी तेलंगणा’चे आश्वासन मोडले आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीने तेलंगणातील जनतेला केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, पक्ष राज्यातील जनतेला सहा ‘गॅरंटी’ देईल. 2014 मध्ये तेलंगण राज्याची निर्मिती झाल्यानंतर तेलंगणातील जनतेच्या संघर्षाचे फळ मिळाले. तेलंगणातील जनतेला ‘बंगारू तेलंगणा’ची (सोनेरी तेलंगणा) अपेक्षा होती.
News Title : Congress Telangana Rally LIVE Rahul Gandhi Sonia Gandhi 17 September 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार