18 November 2024 6:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

GMR Power Share Price | असे स्वस्त शेअर खरेदी करून संयम पाळा, 6 महिन्यात 153 टक्के परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत

GMR Power Share Price

GMR Power Share Price | जीएमआर पॉवर आणि अर्बन इन्फ्रा म्हणजेच GPUIL कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 46.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे.

मागील एका महिन्यात जीएमआर पॉवर आणि अर्बन इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सची किंमत 74.40 टक्के वाढली आहे. वीज निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या जीएमआर पॉवर आणि अर्बन इन्फ्रा कंपनीचे शेअर्स सलग चार ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी जीएमआर पॉवर आणि अर्बन इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के घसरणीसह 43.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच जीएमआर पॉवर आणि अर्बन इन्फ्रा कंपनीला स्मार्ट मीटरिंग प्रकल्पासाठी LOA जारी करण्यात आले होते. त्यांनतर कंपनीच्या शेअरमध्ये 39 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. दक्षिणांचल इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने जीएमआर पॉवर आणि अर्बन इन्फ्रा कंपनीला 2,470 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.

या ऑर्डर अंतर्गत जीएमआर पॉवर आणि अर्बन इन्फ्रा कंपनीला इलेक्ट्रिसिटी सेक्टरमध्ये 2.552 दशलक्ष स्मार्ट मीटर स्थापन आणि देखरेख करण्याचे काम देण्यात आले आहे. या ऑर्डरची पूर्तता करण्याचा कालावधी 27 महिने आहे. आणि देखरेखीचा कालावधी प्रोजेक्ट पूर्ण झाल्याच्या तारखेपासून पुढील 93 महिने असणार आहे.

जीएमआर पॉवर आणि अर्बन इन्फ्रा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आग्रा आणि अलिगढ झोनसाठी कंपनीला मिळालेल्या ऑर्डरचे मूल्य 2,469.71 कोटी रुपये आहे. हा प्रकल्प 10 वर्ष चालणार आहे. यापूर्वी 3 सप्टेंबर 2023 रोजी स्मार्ट मीटरिंग प्रकल्पाचे काम करण्यासाठी GMR कंपनीला पूर्वांचल विद्युत वितरण निगमने 5123 कोटी रुपये मूल्याचे LOA जारी केले होते. उत्तर प्रदेशातील पूर्वांचल म्हणजेच वाराणसी, आझमगड झोन आणि प्रयागराज, मिर्झापूर झोन या क्षेत्रात जीएमआर पॉवर आणि अर्बन इन्फ्रा कंपनी स्मार्ट मीटरिंग प्रकल्पाचे काम करणार आहे.

वरील निर्धारित क्षेत्रात जीएमआर पॉवर आणि अर्बन इन्फ्रा कंपनीला 5.017 दशलक्ष स्मार्ट मीटर बसवण्याचे आणि त्याचे देखरेख करण्याचे काम पूर्ण करायचे आहे. दरम्यान GMR कंपनीने उत्तर प्रदेश सरकारसोबत 2028 पर्यंत विविध प्रकल्प पूर्ण करण्याचा 45,000 कोटी रुपये मूल्याचा सामंजस्य करार केला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने जीएमआर पॉवर आणि अर्बन इन्फ्रा कंपनी सोबत हा करार सौरऊर्जा, ऊर्जा कार्यक्षमता, ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा, ग्रीन हायड्रोजन प्लांट्स, डेटा सेंटर्स आणि इतर अनेक क्षेत्रात विकास कार्य पार पाडण्यासाठी केला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जीएमआर पॉवर आणि अर्बन इन्फ्रा कंपनीने GMR इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे विलीनीकरण आणि GMR Airports Infrastructure Limited आणि GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर या दोन सूचीबद्ध कंपन्यांचे विलगीकरण अमलात आणले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GMR Power Share Price today on 20 September 2023.

हॅशटॅग्स

GMR Power Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x