24 November 2024 7:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Advik Capital Share Price | चिल्लर किंमतीचा पेनी शेअर! किंमत 2 रुपये 62 पैसे, मागील एका महिन्यात 30 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?

Advik Capital Share Price

Advik Capital Share Price | अॅडवीक कॅपिटल कंपनीच्या शेअरने मागील 5 दिवसांत आपल्या गुंतवणुकदारांना 5.2 टक्के परतावा दिला आहे. अॅडवीक कॅपिटल या पेनी स्टॉक कंपनीचे एकूण बाजार भांडवल 112 कोटी रुपये आहे. अॅडवीक कॅपिटल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5.01 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1.9 रुपये होती. (Penny Stocks)

मागील एका महिन्यात अॅडवीक कॅपिटल कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी अॅडवीक कॅपिटल कंपनीचे शेअर्स 2.62 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

2 सप्टेंबर 2023 रोजी अॅडवीक कॅपिटल कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी राईट इश्यू संबंधित अटी व शर्तीचे निर्धारण केले होते. आता या यासंदर्भात कंपनीच्या शेअर धारकांकडून मंजुरी मिळाली आहे. अॅडविक कॅपिटल कंपनी 50 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्यासाठी राइट्स इश्यू जाहीर करणार आहे. या राइट्स इश्यू अंतर्गत कंपनी 20.79 कोटी इक्विटी शेअर्स जारी करणार आहे.

अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपये आहे. कंपनीने आपल्या राइट्स इश्यूमध्ये शेअरची किंमत बँड 2.40 रुपये निश्चित केली आहे. अॅडविक कॅपिटल कंपनीचा राईट इश्यू 7 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2023 दरम्यान खुला राखणार आहे. सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने कळवले आहे की, जर एखाद्या शेअर होल्डरकडे अॅडविक कॅपिटल कंपनीचे 18 शेअर्स असतील तर त्याला राइट इश्यूच्या माध्यमातून 17 शेअर्स खरेदी करता येईल.

4 नोव्हेंबर 2020 रोजी अॅडवीक कॅपिटल कंपनीचे शेअर्स 0.28 पैसे या आपल्या नीचांकी पातळीवर ट्रेड करत होते. तर या किमतीवरून हा स्टॉक 8 पट वाढला आहे. 11 एप्रिल 2023 रोजी अॅडवीक कॅपिटल कंपनीने भांडवल उभारणी संदर्भात शेअर धारकांची मंजुरी घेतली होती. 18 मे 2023 रोजी टपाल मतपत्रिकेद्वारे भांडवल उभारणीच्या योजनेला गुंतवणूकदारांनी मंजुरी दिली.

आता ही कंपनी 50 कोटी रुपये निधी उभारण्याची तयारी करत आहे. त्याचेच पुढील पाऊल म्हणून कंपनीने राइट्स इश्यू जाहीर केला आहे. अॅडवीक कॅपिटल ही नॉन-बँकिंग फायनांस कंपनी लोकांना आवश्यक भाडेपट्टी, वित्त, गुंतवणूक आणि इतर कॉर्पोरेट भाडेपट्टीवर सल्ला देण्याचे काम करते. या कंपनीचा ग्राहक वर्ष भारतासहित जगभरात पसरला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stock Advik Capital Share Price today on 21 September 2023.

हॅशटॅग्स

#Advik Capital Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x