25 November 2024 1:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Brand Rahul Gandhi | भारत जोडो यात्रा सुरूच, राहुल गांधी थेट रेल्वे स्थानकावर कुलीच्या पोशाखात, कुली आणि रिक्षाचालकांची भेट घेतली

Brand Rahul Gandhi

Brand Rahul Gandhi | काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरूच आहे. राहुल गांधी आज दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहोचले. येथे त्यांनी कुलींची आणि रिक्षाचालकांची भेट घेतली आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी कुलींमध्ये बसलेले दिसत आहेत.

काँग्रेसने एक्सवर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “भारत जोडो यात्रा सुरूच! महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जननायक राहुल गांधी यांनी भारताला जोडण्याचा प्रवास सुरू केला आहे. आज त्यांचा ताफा दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहोचला. राहुल यांनी कुलींच्या मनातील समस्या एकूण घेतल्या, त्यांचे दु:ख आणि अडचणी ऐकल्या आणि समजून घेतल्या असं काँग्रेसने म्हटलं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने एक व्हिडिओही जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी कुलींचा ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. याशिवाय प्रवाशाचे सामान ही तो डोक्यावर घेऊन जाताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी डोक्यावर सूटकेस घेऊन काही अंतर चालताना आणि नंतर दुसऱ्या कुलीला देताना दिसत आहेत. यावेळी स्टेशनवर अनेक कुलींची गर्दी दिसत आहे. राहुल गांधी यांनीही कुलींचा ड्रेस परिधान केला आहे.

खरं तर ऑगस्ट महिन्यात कुलींचा चा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये कुलींनी राहुल गांधीयांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर आता राहुल गांधी त्यांना भेटायला आले होते. राहुल गांधी यांनी आनंद विहारमध्ये रिक्षाचालक आणि कुलींची भेट घेतली याचा मला खूप आनंद आहे. आमचे प्रश्न सरकारसमोर ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Brand Rahul Gandhi reached Delhi Anand Vihar Railway station to meet coolie 21 September 2023.

हॅशटॅग्स

#Brand Rahul Gandhi(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x