24 November 2024 11:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

IFCI Share Price | वडापाव पेक्षा स्वस्त IFCI पेनी शेअरने 2 दिवसात 28 टक्के परतावा दिला, अप्पर सर्किटवर परतावा मिळतोय

IFCI Share Price

IFCI Share Price | IFCI लिमिटेड या आर्थिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IFCI लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 21.40 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर प्रचंड ट्रेडिंग व्हॉल्यूममुळे या कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. (Penny Stocks)

मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये सरकारी मालकीच्या IFCI लिमिटेड कंपनीचे शेअर्स 28 टक्के मजबूत झाले आहेत. आज गुरूवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी IFCI लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.08 टक्के घसरणीसह 20.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एप्रिल 2018 नंतर आता IFCI लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपली सर्वोच्च किंमत पातळी स्पर्श केली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिवसा अखेर IFCI लिमिटेड कंपनीचे शेअर्स 13.09 टक्के वाढीसह 21.08 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. IFCI कंपनी मुख्यतः विमानतळ, रस्ते, दूरसंचार, वीज, रिअल इस्टेट आणि उत्पादन सेवांसाठी वित्तपुरवठा करण्याचा व्यवसाय करते.

IFCI लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 21.60 रुपये आहे. तथापि तरलतेच्या कमतरतेमुळे IFCI कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कर्ज देण्यावर बंधने आणली आहेत. आर्थिक वर्ष 2023 मध्ये IFCI कंपनीचा निव्वळ तोटा 287 कोटी रुपयेपर्यंत कमी झाला असल्याची माहिती कंपनीने जाहीर केली आहे.

आर्थिक वर्ष 2022 मध्ये IFCI लिमिटेड कंपनीला 1,991 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.03 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5,248.11 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IFCI Share Price today on 21 September 2023.

हॅशटॅग्स

IFCI Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x