22 November 2024 5:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

IRFC Vs RVNL Share | IRFC आणि RVNL शेअर्स धमाका करत आहेत, 1 महिन्यात 56 टक्के परतावा दिला, कोणता अधिक फायद्याचा?

IRFC Vs RVNL Share

IRFC Vs RVNL Share | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IRFC कंपनीचे शेअर्स 20 सप्टेंबरच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाल. या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच केंद्र सरकारने IRFC कंपनीच्या विद्यमान मुख्य व्यवस्थापकीय संचालक शैली वर्मा यांना सहा महिन्यांची मुदत वाढ दिली आहे.

ही बातमी प्रसिद्ध होताच गुंतवणूकदारांनी IRFC स्टॉकमध्ये जोरदार खरेदी सुरू केली. यासह कंपनीचे बाजार भांडवल 1 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. आज शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी IRFC स्टॉक 0.54 टक्के वाढीसह 74.85 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

कार्यकाळ वाढीचा तपशील

IRFC कंपनीने आपल्या स्टॉक नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, शैली वर्मा यांचा कार्यकाळ केंद्र सरकारने सहा महिन्यांच्या अतिरिक्त कालावधीसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्या IRFC कंपनीमध्ये वित्त संचालक पदाव्यतिरिक्त, मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून देखील जबाबदारी पार पाडत आहेत. त्याचा हा अतिरीक्त कार्यकाळ 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार आहे.

शेअर्सची कामगिरी

एप्रिल-जून 2023 तिमाहीच्या निकालांमध्ये IRFC कंपनीने ऑपरेशन्स मधील महसुल संकलनात वार्षिक 18.69 टक्के वाढ नोंदवली आहे. आणि कंपनीने 6,679 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तुलनेत 6.31 टक्क्यांच्या घसरणीसह 1,157 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जून तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 100 टक्के फ्लॅट होता. मागील एका महिन्यात IRFC कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 187 टक्के नफा कमावून दिला होता. 2023 या वर्षात IRFC कंपनीचे शेअर्स 133 टक्के मजबूत झाले आहेत. आणि मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 255 टक्के अधिक नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs RVNL Share today on 22 September 2023.

हॅशटॅग्स

IRFC Vs RVNL Share(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x