27 December 2024 4:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तुफान तेजीत येणार, कंपनीला एका मागून एक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा सपाटा, फायदा घेणार?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या भारतातील आघाडीच्या पवन ऊर्जा निर्मिती कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारी जोरदार घसरण पाहायला मिळाली होती. मागील काही महिन्यांपासून मोठ्या ऑर्डर मिळाल्याच्या बातमीने सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. मात्र अचानक या स्टॉकमध्ये पडझड पाहायला मिळत आहे.

शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरल होते. मात्र शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी दिवसा अखेर हा स्टॉक चांगला रिकव्हर झाला, आणि शेवटी 1.18 टक्के घसरणीसह 25.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

सुझलॉन एनर्जी कंपनीने शुक्रवारी सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीला जागतिक वीज उत्पादक कंपनी ब्राइटनाइटने 29.4 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. या ऑर्डर अंतर्गत सुझलॉन कंपनी S120-140m विंड टर्बाइन जनरेटरच्या 14 युनिट्सचे उत्पादन करेल. या प्रकल्पात प्रत्येक टर्बाइनची क्षमता 2.1 मेगावॅट असणार आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीला हा पवन ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात उभारायचा आहे. एप्रिल 2024 पासून हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पात सुझलॉन कंपनीची पुरवठा, आणि प्रकल्प स्थापना, व ऊर्जा केंद्र कार्यान्वित करण्याचे आकम करणार आहे. यानंतर ही कंपनी ऑपरेशन आणि देखभाल संबंधित सेवा देखील प्रदान करणार आहे.

ब्राइटनाइट कंपनीकडून सुझलॉन एनर्जी कंपनीला मोठी ऑर्डर मिळाल्याची बातमी येताच लाल निशाणीवर ट्रेड करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार रिकव्हरी पाहायला मिळाली. ट्रेडिंग सेशन दरम्यान या कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले होते. मार्केट ओपनिंगमध्ये सुरुवातीला सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती, आणि हा स्टॉक 24.50 रुपये या दैनिक नीचांक किंमत पातळीवर पोहोचला होता. 21 सप्टेंबर 2023 च्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक 25.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 6 महिन्यांत 225 टक्के परतावा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षभरात प्रचंड उसळी घेतली आहे. 2023 या वर्षात आतापर्यंत हा स्टॉक 135 टक्के वाढला आहे.

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 185 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 27.05 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 6.6 रुपये होती. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 34,061 कोटी रुपये आहे.

सुझलॉन एनर्जीवर खूप मोठे कर्जाचे डोंगर होते. आता मात्र ही कंपनी तब्बल 15 वर्षांनंतर पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. विविध म्युच्युअल फंड कंपन्यांकडून या पवन ऊर्जा कंपनीच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे. ऑगस्ट 2023 मध्ये विविध म्युच्युअल फंड कंपन्यांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे 50 कोटी शेअर्स खरेदी करून खूप मोठी गुंतवणूक केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 23 September 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(279)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x