25 November 2024 4:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Karnataka Bank Share Price | बँक FD सोडा! कर्नाटक बँक शेअरने अवघ्या 6 महिन्यात 95 टक्के परतावा दिला, आता नवीन टार्गेट प्राईस पहा

Karnataka Bank Share Price

Karnataka Bank Share Price | कर्नाटक बँक स्टॉकमध्ये मागील काही महिन्यांपासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये कर्नाटक बँक स्टॉक 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी कर्नाटक बँक स्टॉक 2.78 टक्क्यांच्या घसरणीसह 241.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. कर्नाटक बँक नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर देत आहे.

या बँकेच्या शेअरमधील सकारात्मक दृष्टीकोन पाहता ब्रोकरेज हाऊस ICICI Direct ने कर्नाटक बँक स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मागील 6 महिन्यांत कर्नाटक बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 95 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी कर्नाटक बँक स्टॉक 4.57 टक्के वाढीसह 252.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअरची टार्गेट प्राईस
ICICI डायरेक्ट फर्मच्या तज्ञांनी 6-12 महिन्यांसाठी कर्नाटक बँकच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. आणि तज्ञांनी या बँकिंग स्टॉकवर 285 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 21 सप्टेंबर 2023 रोजी कर्नाटक बँक स्टॉक 241.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही सध्याच्या किंमतीवर कर्नाटक स्टॉक खरेदी केला, तर तुम्हाला 18-19 टक्के नफा मिळू शकतो. मागील 6 महिन्यांत कर्नाटक बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 95 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या बँकेचा शेअर 221.02 टक्के मजबूत झाला आहे.

कर्नाटक बँक स्टॉकबाबत तज्ञांचे मत
विविध ब्रोकरेज हाऊसच्या तज्ञांच्या मते कर्नाटक बँकेचा फोकस भौगोलिक आणि डिजिटल विस्तार करण्यावर अधिक आहे. या बँकेचे मुख्य लक्ष कृषी आणि एमएसएमई कर्ज पुरवठ्यात वाढ करण्यावर अधिक आहे. कर्नाटक बँक किरकोळ कर्ज वाटप वाढवण्यावर अधिक भर देत आहे. या बँकेचा किरकोळ कर्ज वाटप प्रमाण आर्थिक वर्ष 2020 मध्ये 45.5 टक्के होता, जो आर्थिक वर्ष 2023 मध्ये 50.3 टक्क्यांवर पोहचला आहे.

ब्रोकरेज फर्मच्या मते बँक व्यवस्थापनाचे लक्ष्य आर्थिक वर्ष 2024 मध्ये 17-18 टक्के पर्यंत कर्ज वाटपमध्ये वाढ साध्य करण्यावर आहे. बँकेचे मार्जिन स्थिर ठेवण्यावर देखील अधिक भर दिला जात आहे. पुढील काळात कर्नाटक बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता मजबूत राहण्याची शक्यता आहे. आणि बँकेचा GNPA आणखी कमी होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2018 मध्ये या बँकेचा GNPA 4.9 टक्के होता, तर आता आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये तो 3.7 टक्के झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Karnataka Bank Share Price today on 25 September 2023.

हॅशटॅग्स

Karnataka Bank Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x