25 November 2024 5:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Multibagger Stocks | दर वर्षी मिळतोय मल्टिबॅगर परतावा, AVG लॉजिस्टिक शेअर्सची म्युच्युअल फंड कंपन्यांकडूनही खरेदी, स्टॉक डिटेल्स पहा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शेअर बाजारात कधी कोणता शेअर आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले याबाबत अंदाज लावणे अवघड आहे. गुंतवणुकदार नेहमी चांगल्या शेअर्सच्या शोधत असतात, ज्यांचे मूलभूत तत्त्व मजबूत असतील. असे काही शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे, AVG लॉजिस्टिक.

2023 या वर्षात AVG लॉजिस्टिक कंपनीचे शेअर्स 118 रुपयेवरून वाढून 262 रुपयेवर पोहचले आहेत. या काळात गुंतवणूकदारांनी 125 टक्के अधिक नफा कमावला आहे. आज सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी AVG लॉजिस्टिक स्टॉक 0.96 टक्के घसरणीसह 298.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

2 म्युचुअल फंडांनी गुंतवणूक केली
मागील एका वर्षात AVG लॉजिस्टिक स्टॉकची किंमत दुप्पट झाली आहे. काही म्युचुअल फंड हाऊसने देखील AVG लॉजिस्टिक कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले आहे. मुंबई स्थित देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार ब्लू लोटस कॅपिटल कंपनीने AVG लॉजिस्टिक्स कंपनीचे 1,90,000 शेअर्स खरेदी केले आहेत. यासाठी त्यांनी प्रति शेअर 246 रुपये किंमत दिली आहे. म्हणजेच त्यांनी एकूण 4,67,40,000 रुपये गुंतवणूक केली आहे.

इंडिया इमर्जिंग जायंट्स म्युचुअल फंडने देखील AVG लॉजिस्टिक कंपनीचे एकूण 90,000 शेअर्स खरेदी केले आहे. यासाठी त्यांनी एकूण 246 रुपये प्रति शेअर किंमत दिली आहे. इंडिया इमर्जिंग जायंट्स म्युचुअल फंडने या स्टॉकमध्ये एकूण 2,21,40,000 रुपये गुंतवणूक केली आहे.

शेअरची कामगिरी
मागील एका महिन्यात AVG लॉजिस्टिक कंपनीच्या शेअरची किंमत 249.50 रुपये वाढून 298 रुपये किमतीवर पोहचली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 160 रुपयेवरून वाढून 298 रुपये किमतीवर पोहचली होती. आणि मागील एका वर्षात AVG लॉजिस्टिक कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 185 टक्के नफा कमावून दिला आहे. म्हणजेच ज्यां लोकांनी या कंपनीचे शेअर्स होल्ड केले होते, त्यांचे पैसे आता दुप्पट झाले आहेत. कोरोन काळात मार्च 2020 मध्ये AVG लॉजिस्टिक कंपनीचे शेअर्स 25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 298 रुपये किमतीवर पोहचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of AVG Logistics Share price 25 September 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(456)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x