18 November 2024 6:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

जनता महागाई-बेरोजगारी मुद्द्यांवर मतदान करणार की पुन्हा धार्मिक ट्रॅपमध्ये? लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर उद्घाटनाची योजना सज्ज

Ram Mandir

Ayodhya Ram Mandir | देशात 2014 मध्ये नरेंद्र मोदी महागाई आणि बेरोजगारी कमी करण्याचे जनतेला वचन देतं पंतप्रधान पदी विराजमान झाले होते. मात्र मागील १० वर्षात देशात महागाई तसेच बेरोजगारीच्या मुद्द्याने नवे विक्रम रचलेले असताना, दुसरीकडे गौतम अदाणींसारखे उद्योगपती ५-६ वर्षातच जगातील श्रीमंत उद्योजकांच्या पंगतीत जाऊन बसले आहेत.

महागाईमुळे जनतेच्या खिशात पैसा टिकत नाही आणि दुसराकीडे लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने मोदी सरकारवर जनतेचा प्रचंड रोष आहे. त्यामुळे ठराविक प्रसार माध्यमांना हाताशी धरून धार्मिक मुद्द्यांवर जनतेला केंद्रित करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. अयोध्येतील राम मंदिर सुद्धा त्यातील एक मुद्दा असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

त्यामुळे आता अयोध्येतील राम मंदिराच काम १०० टक्के पूर्ण होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उदघाटन केले जाणार आहे. तसेच त्यानंतर हा विषय १-२ आठवडे प्रसार माध्यमांवर चर्चेत ठेवण्यासाठी मोठी योजना भाजपने तयार केल्याचं वृत्त आहे. मात्र यामागे जनतेला महागाई-बेरोजगारी या गंभीर मुद्द्यांपासून विचलित करणे हा मुख्य हेतू असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

पुढील वर्षी जानेवारीत अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहेत. त्यासाठी तेथे विशेष तयारी केली जात आहे. मंदिराच्या उद्घाटनादरम्यान अयोध्येत अनेक दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ते 24 जानेवारी दरम्यान कोणत्याही दिवशी राम मंदिराच्या उद्घाटन समारंभात सहभागी होऊ शकतात. राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी पंतप्रधानांच्या अयोध्या दौऱ्याबाबत आशा व्यक्त केली आहे.

राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान मोदी 20 ते 24 जानेवारी दरम्यान कोणत्याही दिवशी राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा संबंधित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

निमंत्रण पाठवण्यात आले होते
अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण यापूर्वीच देण्यात आले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरातील रामलल्लाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण पंतप्रधान मोदींना दिले होते.

लोकसभा निवडणुकीमुळे युद्धपातळीवर बांधकाम सुरू
राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू असून, डिसेंबरपर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. येथे खांबांवर देवाच्या मूर्ती कोरल्या जात असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात कारागिरांची भरती केली जात आहे. हैदराबादचे कारागीर येथे काम करत आहेत. मंदिराच्या दरवाज्यावरील लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातून मागवण्यात आले आहे.

News Title : Inauguration of Ram temple before Lok Sabha Election 2024 27 September 2023.

हॅशटॅग्स

#Ram Mandir(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x