23 November 2024 7:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

IRFC Vs Jupiter Wagons Share | रेल्वे संबंधित IRFC आणि ज्युपिटर वॅगन्स शेअर्स अल्पावधीत परतावा देतं आहेत, 6 महिन्यात 287 टक्के परतावा

IRFC Vs Jupiter Wagons Share

IRFC Vs Jupiter Wagons Share | मागील काही वर्षांपासून ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. 25 सप्टेंबर 2020 रोजी ज्युपिटर वॅगन्स कंपनीचे शेअर्स 16.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि 27 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 317.60 रुपये किमतीवर पोहचले आहेत. अशा प्रकारे अवघ्या तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1854 टक्के नफा कमावून दिला आहे.

ज्या गुंतवणूकदारांनी तीन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 19.54 लाख रुपये झाले आहेत. आज गुरूवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी ज्युपिटर वॅगन्स स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 333.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ज्युपिटर वॅगन्स कंपनीचे शेअर्स 302.50 रुपये या आपल्या मागील क्लोजिंग किमतीच्या तुलनेत 5 टक्के वाढीसह 317.60 रुपये किमती वर ट्रेड करत होते. ज्युपिटर वॅगन्स कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 358.63 टक्के नफा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात ज्युपिटर वॅगन्स कंपनीच्या शेअरची किंमत 229 टक्के वाढली आहे.

6 सप्टेंबर रोजी ज्युपिटर वॅगन्स कंपनीचे शेअर्स 412.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 27 सप्टेंबर 2022 रोजी ज्युपिटर वॅगन्स स्टॉक 66.90 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

जून 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत, ज्युपिटर वॅगन्स कंपनीने 387.59 टक्के वाढीसह 62.9 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. जून 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत या कंपनीने 12.9 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून 2023 ला संपलेल्या तिमाहीत ज्युपिटर वॅगन्स कंपनीने 154.68 टक्के वाढीसह 755.4 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. यापूर्वी जून 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीने 296.6 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

ज्युपिटर वॅगन्स कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 6100 कोटी रुपये आहे. या कंपनीने झिम्बाब्वे आणि मोझांबिक देशातील विविध निविदांसह रेल्वे मालवाहतुकीसाठी RITES सोबत व्यापारी सामंजस्य करार संपन्न केला आहे. ज्युपिटर वॅगन्स कंपनीने 2023 या वर्षाच्या शेवटीपर्यंत आपला पहिला EV ट्रक लॉन्च करण्याची योजना आखली आहे.

सध्या कंपनी आपल्या EV वाहनांसाठी EV बॅटरी मार्केटचा शोध घेत आहे. ज्युपिटर वॅगन्स ही कंपनी भारतात रेल्वे वॅगन, प्रवासी डबे, वॅगन पार्ट आणि कास्टिंग बनवण्याचे काम करते. ज्युपिटर वॅगन्स ही कंपनी एग्रीगेटर सुविधा रेल्वे वॅगन, हाय-स्पीड बोगी आणि रेल्वे कास्टिंग निर्मिती करण्याचा व्यवसाय देखील करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs Jupiter Wagons Share today 28 September 2023.

हॅशटॅग्स

IRFC Vs Jupiter Wagons Share(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x