18 November 2024 9:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Inspire Films IPO | इन्स्पायर फिल्म्स IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल 40% फायदा, शेअर प्राईस बँड 56 ते 59 रुपये

Inspire Films IPO

Inspire Films IPO | इन्स्पायर फिल्म्स या टेलिव्हिजन कंटेंट कंपनीचा IPO बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी 129.08 पट सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी इन्स्पायर फिल्म्स कंपनीचा IPO 180.41 पट अधिक सबस्क्राईब केला आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या कंपनीचा IPO 147.16 पट सबस्क्राईब केला आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देखील या कंपनीच्या IPO मध्ये 25.27 पट अधिक बोली लावली आहे. (Inspire Films GMP Today)

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, इन्स्पायर फिल्म्स कंपनीचा IPO स्टॉक 24 रुपये GMP किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या कंपनीचा IPO 83 रुपये किमतीवर लिस्ट होऊ शकतो. इश्यू किंमत आणि GMP च्या आधारे या कंपनीचे शेअर्स 40.68 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.

इन्स्पायर फिल्म्स कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 2000 शेअर्स ठेवले आहे. कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बँड 56 रुपये ते 59 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती. किरकोळ गुंतवणूकदारांना या कंपनीच्या IPO मध्ये एक लॉट खरेदी करण्यासाठी 118,000 रुपये किमतीवर जमा करावे लागणार आहेत.

इन्स्पायर फिल्म्स कंपनीने आपल्या IPO मध्ये 35.98 लाख फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले होते. या IPO द्वारे कंपनी 21.23 कोटी रुपये खुल्या बाजारातून उभारणार आहे. इन्स्पायर फिल्म्स IPO 25 सप्टेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला गेला होता. 3 ऑक्टोबर 2023 रोजी गुंतवणूकदारांना IPO स्टॉक वाटप केले जातील. आणि 5 ऑक्टोबर 2023 रोजी पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात IPO शेअर्स जमा होतील.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Inspire Films IPO today on 28 September 2023.

हॅशटॅग्स

Inspire Films IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x