18 November 2024 6:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये
x

Gail Share Price | गेल इंडिया शेअर्सची अचानक खरेदी का वाढली? तज्ज्ञांनी जाहीर केली शेअरची टार्गेट प्राईस, किती परतावा मिळेल?

GAIL Share Price

Gail Share Price | गेल इंडिया लिमिटेड या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. गॅस ट्रान्समिशन व्हॉल्यूममध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एलएनजीच्या किमतीत घसरण पहायला मिळत आहे. आणि एलपीजीची किंमत देखील कमी होत आहे. पेट्रोकेमिकल्स सेगमेंटमध्ये देखील किमत कमी होताना पाहायला मिळत आहे. हे सर्व घटक गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या वाढीसाठी सकारात्मक आहेत. Gail India Share Price

ब्रोकरेज फर्मने गेल इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गेल इंडिया लिमिटेड स्टॉक 121.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरूवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी गेल इंडिया लिमिटेड स्टॉक 0.70 टक्के वाढीसह 122.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ब्रोकरेज फर्म शेअरखानने गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरवर 150 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 11 सप्टेंबर 2023 रोजी गेल इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 129.5 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 83 रुपये होती.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 4 टक्के वाढली आहे. तर मागील तीन महिन्यांत शेअरची किंमत 16 टक्के वाढली आहे. मागील सहा महिन्यांत गेल इंडिया लिमिटेड स्टॉक 17 टक्के मजबूत झाला आहे. तर 2023 या वर्षात गेल इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 26 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 40 टक्के वाढली आहे. गेल इंडिया लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 80 हजार कोटी रुपये आहे.

तज्ज्ञांच्या अहवालानुसार गेल इंडिया लिमिटेड कंपनीचा नफा आर्थिक वर्ष 2024-26 दरम्यान 29 टक्के राहण्याची शक्यता आहे. तर रिटर्न ऑन इक्विटीमध्ये सरासरी 16 टक्के वाढ होणार आहे. गॅस ट्रान्समिशन व्हॉल्यूममध्ये सुधारणा झाल्याने या कंपनीचा EBITDA सुधारण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाची किंमत वाढ आणि स्पॉट एलएनजी किमतीत सुधारणा झाल्यामुळे कंपनीच्या कमाईमध्ये देखील मजबूत वाढ होणार आहे.

स्टँडअलोन आधारावर गेल इंडिया लिमिटेड कंपनीचा EPS म्हणजेच आर्थिक वर्ष 2023 मधील प्रति शेअर कमाई 8.1 रुपये होती. आर्थिक वर्ष 2024-26 मध्ये कंपनीचा EPS प्रती शेअर 13.5 रुपये,15.4 आणि 17.5 रुपये होण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा कॅपिटल एम्प्लॉइड RoCE वर परतावा 8.9 टक्के नोंदवला गेला होता.

पुढील तीन वर्षांमध्ये कंपनीचा ROCE अनुक्रमें 14.1 टक्के, 15 टक्के आणि 16.3 टक्के वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये गेल इंडिया लिमिटेड कंपनीचा P/E गुणक 15.1 पट होता. जो पुढील तीन वर्षात 9 पट, 7.9 पट आणि 6.9 पट कमी होण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GAIL Share Price 28 September 2023.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x