22 November 2024 4:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Multibagger Stocks | मालामाल शेअर! 210 टक्के परतावा देणारा शेअर, कंपनीला ऑर्डर मिळण्याचा सपाटा, खरेदी करणार?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | केएनआर कन्स्ट्रक्शन या नागरी बांधकाम क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सबाबत अनेक ब्रोकरेज फर्म उत्साही पाहायला मिळत आहेत. ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टने केएनआर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. केएनआर कन्स्ट्रक्शन्स कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात जेमतेम चांगली कामगिरी केली आहे. | KNR Construction Share Price

मात्र आता तज्ञांनी या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आज गुरूवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी केएनआर कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स 1.63 टक्के वाढीसह 284.10 रुपये किमतीवर क्लोज झाली आहे.

शेअरची टार्गेट प्राईस
ICICI Direct फर्मने केएनआर कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स खरेदी करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील 6-12 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 340 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. 26 सप्टेंबर 2023 रोजी केएनआर कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स 275.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ज्ञांच्या मते सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक आणखी 23-24 टक्के वाढू शकतो.

मागील 6 महिन्यांत केएनआर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 11 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 5 वर्षात केएनआर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरची किंमत 210 टक्के वाढली आहे. 5 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी केएनआर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 3.10 लाख रुपये झाले आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7,818 कोटी रुपये आहे.

KNR Constructions ही कंपनी मुख्यतः रोड आणि हायवे बनवणारी भारतातील एक आघाडीची कंपनी मानली जाते. या कंपनीने भारतातील 12 विविध राज्यांमध्ये 6,000 किमी पेक्षा जास्त लांबीचे हायवे बांधले आहेत. या व्यतिरिक्त ही कंपनी सिंचन आणि शहरी जल पायाभूत सुविधा व्यवस्थापन संबंधित सेवा देखील प्रदान करण्याचे काम करते.

केएनआर कन्स्ट्रक्शन्स कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार आर्थिक वर्ष 20223-24 मधील पहिल्या तिमाहीत 8045 कोटी रुपये होता. आथिर्क वर्ष 2023 मध्ये केएनआर कन्स्ट्रक्शन कंपनीला 2000 कोटी रुपये मूल्याच्या विविध ऑर्डर्स मिळाल्या होता. केएनआर कन्स्ट्रक्शन कंपनीला आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 4000-5000 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.

ही कंपनी राजस्थान, मध्य प्रदेश तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये जल सिंचनाच्या ऑर्डर मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीचा ताळेबंद सध्या कर्जमुक्त आहे. जून तिमाहीत कंपनीकडे 85 कोटी रुपये कॅश इन हॅण्ड रक्कम होती. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते कंपनीला आणखी काही ऑर्डर मिळू शकतात. याने कंपनीच्या महसुलात आणखी वाढ होईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks KNR Construction Share Price 28 September 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x