22 November 2024 4:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Jio Financial Share Price | काय सांगता? जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर अल्पावधीत 300 रुपयांवर पोहोचणार, तज्ज्ञांनी काय म्हटले?

Jio Financial Share Price

Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 225 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.43 लाख कोटी रुपये आहे.

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 267 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 203 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 2.64 टक्के वाढीसह 231.00 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स 211 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 21 ऑगस्ट 2023 पासून जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर आले आहेत. आता जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 12 टक्के पेक्षा जास्त वाढले आहेत.

तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. म्हणून तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 300 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. जिओ फायनान्शियल ही कंपनी इन्शुरन्स, म्युच्युअल फंड आणि इतर सेगमेंटमध्ये व्यवसाय सुरू करण्याची तयारी करत आहे. म्हणून शेअर्समध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते जिओ फायनान्शियल स्टॉक पुढील 6 महिन्यांत 300 रुपये लक्ष किंमत स्पर्श करू शकतो. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी पूर्वी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. जुलै 2023 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीमधून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी डिमर्ज करण्यात आली. 20 जुलै 2023 रोजी झालेल्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शियल शेअर्सची प्री-लिस्टिंग किंमत 261.5 रुपये निश्चित करण्यात आली.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी NSE आणि BSE इंडेक्समध्ये सूचीबद्ध करण्यात आले होते. सुरूवातील स्टॉक लिस्ट झाल्यावर शेअर्समध्ये पाच टक्के वाढ झाली होती. नंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअर्समधील अप्पर सर्किट मर्यादा 5 टक्क्यांवरून वाढवून 20 टक्के करण्यात आली आहे. ही अप्पर सर्किट मर्यादा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 पासून लागू झाली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Financial Share Price 29 September 2023.

हॅशटॅग्स

Jio Financial Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x